हिवाळ्यात काेरड्या पडलेल्या त्वचेला द्या 'हे' सुपरटॉनिक! ५ पदार्थ खा- ड्राय त्वचा होईल मुलायम
Updated:December 3, 2024 15:29 IST2024-12-03T15:23:45+5:302024-12-03T15:29:26+5:30

हिवाळ्यात त्वचा खूप काेरडी होते. कोरड्या पडलेल्या त्वचेला कधी कधी खूप खाजसुद्धा येते. त्वचेचा काेरडेपणा कमी करण्यासाठी आपण वेगवेगळे क्रिम, मॉईश्चरायझर लावतो. पण यासोबतच आपल्या आहारातसुद्धा काही बदल करणं आवश्यक आहे.
हिवाळ्यात आपण असे काही पदार्थ आवर्जून खायला पाहिजेत जे आपल्या त्वचेला पोषण देतील, त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी नैसर्गिक पद्धतीने मदत करतील. ते पदार्थ नेमके कोणते ते पाहा...
पहिला पदार्थ आहे रताळे. रताळ्यांमध्ये त्वचेसाठी उपयुक्त ठरणारे व्हिटॅमिन ए असते. शिवाय त्यात असलेल्या ॲण्टीऑक्सिडंट्समुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते.
दुसरा पदार्थ आहे पालक. पालकामधून व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी मिळते. त्यामुळे त्वचेतल्या कोलॅजिनची निर्मिती चांगली होते.
अव्हाकॅडोमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई मोठ्या प्रमाणावर असते. त्याशिवाय त्यामध्ये ओमेगा ९ फॅटी ॲसिडही असते. त्यामुळे त्वचा छान माॅईश्चराईज राहाते.
ब्रोकोलीमध्येही त्वचेसाठी उपयुक्त ठरणारे व्हिटॅमिन ए आणि सी असते. शिवाय त्यात असणारे व्हिटॅमिन बी त्वचा कोरडी पडू देत नाही.
गाजरामध्ये बीटा कॅरोटीन, लायकोपीन असते. तीव्र सुर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण करण्यासाठी ते उपयुक्त ठरते.