पेट्रोलियम जेलीचे जबरदस्त ६ हॅक्स, हिवाळ्यात मिळवा कोमल त्वचा

Published:November 21, 2022 07:52 PM2022-11-21T19:52:29+5:302022-11-21T19:58:21+5:30

Petroleum Jelly Winter Care Hacks पेट्रोलियम जेलीमध्ये बऱ्याच प्रमाणावर औषधी गुणधर्म आहेत. जे त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास मदत करतात.

पेट्रोलियम जेलीचे जबरदस्त ६ हॅक्स, हिवाळ्यात मिळवा कोमल त्वचा

हिवाळा हा ऋतू सुरू होताच लोकांना फिरण्याचे, गरम आणि चमचमीत पदार्थ खाण्याचे वेड लागते. हिवाळा हा ऋतू सगळ्यांना आवडत असला, तरी त्यापासून शरीरावर होणारे दुष्परिणाम बहुतांश लोकांना आवडत नाही.

पेट्रोलियम जेलीचे जबरदस्त ६ हॅक्स, हिवाळ्यात मिळवा कोमल त्वचा

थंडीमुळे त्वचा कोरडी, निर्जीव आणि निस्तेज बनते. कोरड्या त्वचेमुळे स्किन काळपट पडू लागते आणि ओठही फुटू लागतात. या सगळ्या गोष्टींवर एकच रामबाण उपाय ती म्हणजे पेट्रोलियम जेली. या जेलीमध्ये औषधी गुणधर्म बऱ्याच प्रमाणावर आढळून येते. जी त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास आणि कोमल ठेवण्यास मदत करते.

पेट्रोलियम जेलीचे जबरदस्त ६ हॅक्स, हिवाळ्यात मिळवा कोमल त्वचा

पेट्रोलियम जेली वापरण्यास सोपी आहे, सोबत बजेट फ्रेंडली आहे. जेली वापरण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे निस्तेज त्वचेवर नियमित लावणे. विशेषत: कोपर, गुडघे, घोटे किंवा टाच. यासारख्या भागात ही जेली पोषण रुपात स्किनला हायड्रेटेड ठेवते. ज्यामुळे त्वचेवर उठणारी खाज या जेलीमुळे कमी होते.

पेट्रोलियम जेलीचे जबरदस्त ६ हॅक्स, हिवाळ्यात मिळवा कोमल त्वचा

भेगा पडलेल्या टाचांवर पेट्रोलियम जेली लावण्याची उत्तम वेळ म्हणजे झोपण्यापूर्वी. जर तुमच्या टाचांना तडे गेले असतील तर तुम्ही ही जेली रोज झोपण्यापूर्वी पायांना लावू शकता. ओलावा टिकवण्यासाठी जेली लावून मोजे घाला. सकाळी स्वच्छ पाण्याने पाय धुवून टाका. अश्याने भेगा पडलेल्या टाचा लवकर बरे होतील.

पेट्रोलियम जेलीचे जबरदस्त ६ हॅक्स, हिवाळ्यात मिळवा कोमल त्वचा

पेट्रोलियम जेली अंडरआय क्रीम म्हणून वापरली जाऊ शकते. रेगुलर आय क्रीमसाठी हा एक उत्तम पर्याय मानला जातो. परंतु जर तुम्हाला डोळ्यांभोवती मिलिया होण्याची शक्यता असेल तर जेल वापरणे टाळावे. डोळ्यांच्या संबंधित कोणतेही आजार असतील तर पेट्रोलियम जेली वापरू नये.

पेट्रोलियम जेलीचे जबरदस्त ६ हॅक्स, हिवाळ्यात मिळवा कोमल त्वचा

फाटलेल्या ओठांवर पेट्रोलियम जेली एक औषध म्हणून काम करते. आपण या जेलीचा रात्रभर लिप मास्क म्हणून वापर करू शकता, किंवा दिवसा देखील तुम्ही ओठांवर ही जेली वापरू शकता. अथवा लिपस्टिकवर चमक आणण्यासाठीही या जेलीचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या ओठांना दिवसभर पोषण मिळेल आणि तुम्हाला फाटलेल्या ओठांची काळजी करण्याची गरज देखील पडणार नाही.

पेट्रोलियम जेलीचे जबरदस्त ६ हॅक्स, हिवाळ्यात मिळवा कोमल त्वचा

पेट्रोलियम जेलीत व्हिटॅमिन ई असते जे तुमच्या क्यूटिकलसाठी चांगले असते. तुमच्या नखांभोवतीची त्वचा निघत असेल तर तुम्ही याचा वापर करू शकता. यासह कोरड्या हातांपासून देखील सुटका मिळेल.

पेट्रोलियम जेलीचे जबरदस्त ६ हॅक्स, हिवाळ्यात मिळवा कोमल त्वचा

जखमा बऱ्या करण्यास पेट्रोलियम जेली खूप उपयुक्त आहे. बरेच लोक कापलेल्या किंवा खरचटलेल्या ठिकाणांवर बरं करण्यासाठी पेट्रोलियम जेलीचा वापर करतात. जेली ओलावा प्रदान करून उपचार प्रक्रियेस गती देण्यास मदत करू शकते.