Join us

६ कारणांमुळे भुवयांचे केस गळून त्या बारीक होतात! एकदा बघा तुम्हालाही 'हे' त्रास आहेत का...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2025 09:25 IST

1 / 7
आपल्या शरीरात होणारा कोणताही बदल आपल्या आरोग्याविषयीची सूचना देत असतो. पण आपल्याला त्याविषयी फारशी माहिती नसल्याने आपण त्याकडे दुर्लक्ष करतो..जर भुवयांचे केस वरचेवर गळून भुवया बारीक, पातळ होत असतील तर त्यामागेही काही कारणं आहेत. ती कारणं नेमकी कोणती ते पाहा...डॉ. रिंकी कपूर यांनी सांगितलेली ही कारणं हेल्थशॉटने प्रकाशित केली आहेत.
2 / 7
शरीरात व्हिटॅमिन सी, बायोटीन, ओमेगा ३ फॅटी ॲसिड यांच्या कमतरतेमुळे भुवयांचे केस गळतात.
3 / 7
बऱ्याचदा त्वचेचा काही रोग असेल तर त्यामुळेही भुवयांचे केस गळतात.
4 / 7
स्ट्रेस, एन्झायटी यामुळे शरीरातील हार्मोन्सची पातळी बिघडते आणि त्यामुळेही केस गळतात.
5 / 7
बाळंतपण, गरोदरपण यादरम्यान होणाऱ्या हार्मोन्सच्या बदलांमुळेही भुवयांचे केस गळू शकतात.
6 / 7
थायरॉईडच्या त्रासामुळेही डोक्यावरचे तसेच भुवयांचे केस गळतात.
7 / 7
वयाच्या चाळीशीनंतरही शरीरात होणाऱ्या बदलांमुळे भुवयांचे केस गळू शकतात.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजी