Join us   

फक्त ६ पदार्थ रोज आठवणीने खा! केसांचे सगळे प्रॉब्लेम संपतील, केस गळणार नाहीत- वाढतील भराभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2024 3:52 PM

1 / 9
केस गळून गळून खूप पातळ झाले असतील, केसांची वाढ खुंटली असेल किंवा केस कमी वयातच पांढरे झाले असतील तर लगेच तुमच्या आहारात थोडा बदल करा.
2 / 9
केसांच्या उत्तम आरोग्यासाठी कोणते पदार्थ उपयुक्त आहेत, याविषयीचा व्हिडिओ डॉक्टरांनी drnikki_ayurveda_health या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. त्यामध्ये आयुर्वेदानुसार केसांसाठी उत्तम ठरणारे पदार्थ कोणते, याविषयीची माहिती दिली आहे.
3 / 9
हे ६ पदार्थ जर तुम्ही नियमितपणे खाल्ले तर केसांच्या समस्या कमी करण्यासाठी इतर कोणत्याही उपायांची गरज पडणार नाही, असं त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
4 / 9
यातला पहिला पदार्थ आहे बदाम. रोज ४ बदाम खावेत. त्यातून आपल्याला व्हिटॅमिन ई, बी १, बी ६, झिंक, ओमेगा ३, सेलेनियम आणि मॅग्नेशियम मिळतं. या सगळ्या गोष्टी केसांच्या वाढीसाठी अतिशय फायदेशीर ठरतात.
5 / 9
दुसरं आहे भोपळ्याच्या बिया. त्यातून ओमेगा ३ फॅटी ॲसिड आणि फायटो केमिकल मिळतं. जे केसांच्या मुळांच्या मजबुतीसाठी उपयुक्त ठरतं. तसेच या पदार्थांमुळे टाळूवरील कोरडेपणा कमी होतो.
6 / 9
सुर्यफुलाच्या बियाही नियमित खाव्या. त्यातून झिंक, मॅग्नेशियम, सेलेनियम मिळतं. जे केसांच्या वाढीसाठी फायदेशीर असतं.
7 / 9
काळ्या मनुका नियमितपणे खाल्ल्यास केस काळे राहण्यास मदत होते.
8 / 9
अक्रोडमध्ये ओमेगा ३, ओमेगा ६, ओमेगा ९ आणि पोटॅशियम असते. अक्रोड नियमितपणे खाल्ल्यास केसातला कोंडा बऱ्याच प्रमाणात कमी होतो.
9 / 9
अंजीरामध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, सोडियम, व्हिटॅमिन डी असतं. त्यामुळे केसांची चांगली वाढ होते. तसेच केस चमकदार होऊन ते दिर्घकाळ काळे राहण्यास मदत होते.
टॅग्स : ब्यूटी टिप्सकेसांची काळजीहोम रेमेडीअन्न