6 superfoods for hair growth, how to stop hair fall, best tonic for controlling hair loss
केसांना भरभरून पोषण देणारे ६ पदार्थ, रोजच खा- केसांचं गळणं होईल बंद, वाढतील भराभर...Published:May 15, 2024 12:50 PM2024-05-15T12:50:07+5:302024-05-15T12:55:36+5:30Join usJoin usNext केस गळणं खूप वाढल्यामुळे केस खूप पातळ झाले असतील तर हे काही पदार्थ तुमच्या आहारात रोजच असायला पाहिजेत. कारण हे पदार्थ म्हणजे तुमच्या केसांसाठी एक प्रकारचं सूपरफूड आहेत. हे पदार्थ तुमच्या आहारात नेहमीच असतील तर त्यामुळे केसांना आतून पोषण मिळेल आणि त्यांची मुळं पक्की होऊन गळणं कमी होईल, शिवाय त्यांची वाढदेखील चांगली होईल. यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ आहे पालक. पालकामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. जर तुमच्या शरीराला पुरेसं लोह मिळालं तरच तुमच्या शरीरात ऑक्सिजन योग्य प्रकारे शोषून घेतला जातो. केसांच्या मुळांना चांगल्या प्रकारे ऑक्सिजन मिळाले तर ती मजबूत होण्यास मदत होते. लिंबू आणि लिंबूवर्गीय फळे केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतात. कारण या फळांमधून व्हिटॅमिन सी मिळते. तुमच्या शरीरात असणारे लोह रक्तामध्ये व्यवस्थित शोषले जावे, यासाठी व्हिटॅमिन सी उपयुक्त ठरते. बदामातून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई मिळते. जे केसांच्या वाढीसाठी, त्यांच्या मजबुतीसाठी उपयुक्त असते. अक्रोडमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते. ज्याचा केसांच्या वाढीसाठी फायदा होतो. त्यामुळे दररोज २ ते ३ अक्रोड पाण्यात भिजवून खाल्ले पाहिजेत. गाजरामध्ये असणारे व्हिटॅमिन ए स्काल्पमधून सेबमची निर्मिती होण्यासाठी मदत करते. सेबम हे केसांसाठी नैसर्गिक तेल किंवा मॉईश्चरायझर मानले जाते. ॲव्हाकॅडोमधूनही व्हिटॅमिन ई मिळते. जे केसांच्या वाढीसाठी चांगले मानले जाते. टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीअन्नBeauty TipsHair Care Tipsfood