हिवाळ्यात त्वचेसाठी चुकूनही वापरु नयेत ६ गोष्टी, त्वचेतील ओलावा शोषला जाऊन होईल कोरडी...

Updated:December 17, 2024 15:58 IST2024-12-17T15:46:20+5:302024-12-17T15:58:24+5:30

Do Not Apply These 6 Things On Your Skin In Winters Otherwise The Problem Of Dryness Will Increase : 6 Things To Avoid While Doing Skin Care In Winters : Skincare Mistakes to Avoid During Winters : थंडीमुळे त्वचा कोरडी पडली असेल तर लावू नयेत अशा ६ गोष्टी, त्वचा सुधारण्याऐवजी होईल अधिकच खराब...

हिवाळ्यात त्वचेसाठी चुकूनही वापरु नयेत ६ गोष्टी, त्वचेतील ओलावा शोषला जाऊन होईल कोरडी...

सध्या थंडीचे दिवस सुरु झाले आहेत. या दिवसांत त्वचा कोरडी पडू नये किंवा त्वचेतील ओलावा, आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी अनेक नैर्सर्गिक पदार्थांचा वापर केला जातो. परंतु त्वचेसाठी अशा नैसर्गिक पदार्थांचा वापर करताना काहीवेळा चुकीचे पदार्थ वापरले जातात. ज्यामुळे त्वचेत सुधारणा होण्याऐवजी ती अधिकच खराब आणि खडबडीत होते. यासाठीच हिवाळ्यात त्वचेची विशेष काळजी घेताना खास करुन घरगुती (6 Things To Avoid While Doing Skin Care In Winters) उपाय करताना हे नैसर्गिक पदार्थ वापरणे शक्यतो टाळाच. हिवाळ्यात त्वचेसाठी वापरु नयेत असे नैसर्गिक पदार्थ कोणते ते पाहूयात.

हिवाळ्यात त्वचेसाठी चुकूनही वापरु नयेत ६ गोष्टी, त्वचेतील ओलावा शोषला जाऊन होईल कोरडी...

थंडीत त्वचेवर लिंबाचा रस लावल्याने त्वचेची आग किंवा जळजळ होऊ शकते. यासाठी हिवाळ्यात त्वेचेसाठी फेसपॅक तयार करताना त्यात लिंबाचा रस घालू नये. लिंबामध्ये आम्ल असते, जे त्वचेचा नैसर्गिक ओलावा कमी करू शकते आणि हिवाळ्यात कोरड्या त्वचेला अधिक हानी पोहोचवू शकते.

हिवाळ्यात त्वचेसाठी चुकूनही वापरु नयेत ६ गोष्टी, त्वचेतील ओलावा शोषला जाऊन होईल कोरडी...

मुलतानी माती त्वचेसाठी खूप चांगली असली तरीही हिवाळ्यात ती वापरणे टाळा, यामुळे त्वचा अधिकच कोरडी होऊ शकते.

हिवाळ्यात त्वचेसाठी चुकूनही वापरु नयेत ६ गोष्टी, त्वचेतील ओलावा शोषला जाऊन होईल कोरडी...

चंदन पावडरचा वापर त्वचा थंड आणि चमकदार करण्यासाठी केला जातो. परंतु हिवाळ्यात यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. हिवाळ्यात त्वचेवर चंदन पावडर लावल्याने त्वचेचा ओलावा शोषला जातो ज्यामुळे कोरडेपणा आणि जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

हिवाळ्यात त्वचेसाठी चुकूनही वापरु नयेत ६ गोष्टी, त्वचेतील ओलावा शोषला जाऊन होईल कोरडी...

बरेचजण त्वचेसाठी फेसपॅक तयार करताना त्यात बेकिंग सोडा वापरतात. बेकिंग सोड्याची पीएच पातळी त्वचेच्या पीएच पातळीपेक्षा जास्त असते. अशावेळी याचा वापर केल्याने त्वचेची पीएच लेव्हल बिघडू शकते, ज्यामुळे त्वचेला कोरडेपणा, जळजळ किंवा लालसरपणा येऊ शकतो.

हिवाळ्यात त्वचेसाठी चुकूनही वापरु नयेत ६ गोष्टी, त्वचेतील ओलावा शोषला जाऊन होईल कोरडी...

हिवाळ्यात त्वचेसाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करणे टाळावे. कडुलिंबाच्या पानांमुळे त्वचा कोरडी पडू शकते आणि त्वचेचा ग्लो निघून जाऊ शकतो. यासाठीच हिवाळ्यात कडुलिंबाच्या पानांचा वापर त्वचेसाठी करु नये.

हिवाळ्यात त्वचेसाठी चुकूनही वापरु नयेत ६ गोष्टी, त्वचेतील ओलावा शोषला जाऊन होईल कोरडी...

काहीजण त्वचेसाठी फेसपॅक तयार करताना त्यात बटाट्याच्या रसाचा वापर करतात. परंतु हिवाळ्यात त्वचेसाठी बटाट्याचा रस वापरु नये. बटाट्याचा रस त्वचेतील ओलावा शोषून घेऊन त्वचा अधिकच कोरडी करु शकतो. यासाठी हिवाळ्यात त्वचेसाठी बटाट्याचा रस वापरणे टाळावे.