Join us

डार्क सर्कल्समुळे कमी वयातच वयस्कर, थकलेले दिसता? ६ उपाय- काळी वर्तुळे जाऊन सुंदर दिसाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2025 16:43 IST

1 / 7
डोळ्यांभोवती आलेली काळी वर्तुळे किंवा डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी हे काही घरगुती उपाय करून बघा.(6 tips for reducing dark circles)
2 / 7
एका जाडसर कपड्यामध्ये बर्फ गुंडाळा आणि अतिशय हळुवारपणे डोळ्याच्या खालच्या त्वचेवर तो फिरवा. यामुळे डोळ्यांखाली आलेली काळी वर्तुळे कमी होतील.(causes of dark circles)
3 / 7
रात्री झोपण्यापूर्वी थोडेसे साजूक तूप बोटावर घ्या आणि त्याने हळूवारपणे डोळ्यांभोवती मसाज करा. यामुळेही डार्क सर्कल्स कमी होतात.
4 / 7
जे लोक खूप जास्त स्क्रीन बघतात त्या लोकांना डार्क सर्कल्स जास्त येतात. त्यामुळे काही दिवस स्क्रीन टाईम कमी करून बघा.
5 / 7
जास्त टेन्शन घेणाऱ्या लोकांनाही डोळ्यांभोवती काळी वर्तुळे येण्याचा त्रास जास्त होतो. त्यामुळे मेडिटेशन, प्राणायाम यासारखे उपाय करून मनावरचा ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
6 / 7
रात्री झोपण्यापूर्वी बदाम तेलाने डोळ्यांभोवती हलक्या हाताने मालिश करा. डार्क सर्कल्स जातील.
7 / 7
डिहायड्रेशन, नेहमीच अपुरी झोप होणे, अशक्तपणा, ॲनिमिया, थकवा ही देखील डोळ्यांभाेवती काळी वर्तुळे वाढण्याची कारणं असू शकतात. त्यामुळे पौष्टिक आहार घ्या, भरपूर पाणी प्या, थोडी विश्रांती घ्या आणि रात्रीची झोप पूर्ण होईल याकडे लक्ष द्या.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीडोळ्यांची निगा