उन्हाळयात कलिंगड खा आणि त्वचेलाही लावा! मिसळा फक्त 'हे' ६ पदार्थ - करा त्वचेचे लाड!
Updated:March 29, 2025 16:23 IST2025-03-29T16:05:04+5:302025-03-29T16:23:41+5:30
How To Make Watermelon Face Pack At Home : Watermelon Face Packs : 6 Ways To Use Watermelon To Make Refreshing DIY Face Packs : Watermelon Face Pack For Summer : उन्हाळ्यात आपण लालचुटुक, रसाळ कलिंगड तर खातो, पण त्वचेला लावल्याने नेमके कोणते फायदे होतात ते पाहा...

उन्हाळ्यांत शरीराला थंडावा देण्यासाठी म्हणून आपण (How To Make Watermelon Face Pack At Home) कलिंगड खातो. कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने ते आपल्याला उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यास मदत करते.
शरीराप्रमाणेच या कलिंगडाच्या रसाचा वापर आपण त्वचेसाठी (6 Ways To Use Watermelon To Make Refreshing DIY Face Packs) देखील करु शकतो. कलिंगडाच्या रसात कोणकोणते पदार्थ मिसळून त्वचेवर लावता येतील आणि त्याचे फायदे काय ते पाहूयात.
१. मध :-
कलिंगडाच्या रसात चमचाभर मध मिसळून हा फेसपॅक त्वचेवर लावावा. १५ मिनिटांनी चेहरा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. मधाने त्वचा मऊ होते, डाग कमी होतात आणि त्वचेला नैसर्गिक चमक येते.
२. एलोवेरा जेल :-
कलिंगडाचा रस काढून त्यात एलोवेरा जेल मिसळून घ्यावे. एलोवेरा जेलमध्ये पाणी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात, जे उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे उन्हाळयात कलिंगडाचा रस आणि एलोवेरा जेल यांचा फेसपॅक लावणे फायदेशीर ठरते.
३. बेसन :-
त्वचेसाठी बेसनाचा वापर फार पूर्वीपासून केला जातो. कलिंगडाच्या रसात बेसन पीठ मिसळून फेसपॅक तयार करून घ्यावा. बेसन नैसर्गिकरित्या त्वचेतील घाण आणि तेल काढते, त्वचा उजळवते, टॅनिंग कमी करते आणि त्वचेचा रंग सुधारते, तसेच पिंपल्स कमी करण्यास देखील मदत करते.
४. दही :-
कलिंगडाचा रस आणि दही समप्रमाणात घेऊन त्वचेवर लावल्याने उन्हाळयात त्वचेला थंडावा मिळण्यास मदत होते. दही त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते, उन्हामुळे त्वचा कोरडी पडत असेल तर हा फेसपॅक नक्की ट्राय करून पाहा.
५. गुलाब पाणी :-
कलिंगडाचा रस आणि गुलाबपाणी एकत्रित मिसळून लावल्याने उन्हाळ्यात त्वचेला थंडावा मिळतो. गुलाबपाणी त्वचेला हायड्रेटेड आणि ताजेतवाने ठेवते, तसेच उन्हाळ्यात त्वचेवरील लालसरपणा आणि जळजळ कमी करते, आणि त्वचेला नैसर्गिकरित्या चमक देऊन मुलायम बनवते.
६. मुलतानी माती :-
कलिंगडाच्या रसात आपण मुलतानी मिसळून देखील लावू शकता. मुलतानी माती थंड गुणधर्माची असते, त्यामुळे उन्हाळयात त्वचेला थंडावा आणि शांत करण्यासाठी कलिंगडाचा रस आणि मुलतानी मातीचा फेसपॅक लावावा.