लग्नसराई स्पेशल : छोट्या केसांची कशी हेअरस्टाईल करावी? ७ आयडिया, ट्रॅडिशनल लूकमध्ये दिसा देखण्या
Updated:December 11, 2024 15:29 IST2024-12-11T14:43:37+5:302024-12-11T15:29:49+5:30

लग्नसमारंभासाठी जाताना आपण बऱ्याचदा ट्रॅडिशनल लूक करत असतो. पण केस जर छोटे असतील तर मग आपल्या ट्रॅडिशनल लूकला शोभणारी हेअरस्टाईल कशी करावी, हा प्रश्न पडतोच..
त्यासाठीच बघा या काही खास आयडिया..लग्नसराईमध्ये अशा काही साध्या सोप्या हेअरस्टाईल तुम्ही अगदी झटपट करू शकता. यामुळे ट्रॅडिशनल लूकमध्ये तुमचे सौंदर्य आणखी उठून दिसेल.
अशा खूप हेअर ॲक्सेसरीज बाजारात मिळतात. किंवा तुम्ही त्या ऑनलाईन शॉपिंग साईटवरूनही घेऊ शकता. त्यांच्या मदतीने खूप आकर्षक हेअरस्टाईल करता येते.
केस अगदीच छोटे असतील तर अशा पद्धतीने एका बाजुने केस वळवून अशा काही हेअर ॲक्सेसरीज लावू शकता.
एका बाजुने केस वळवून अशी वेणी घाला आणि त्या वेणीला स्टोन, मोती किंवा फुलं लावून सजवा.. छान लूक मिळेल.
केसांची एक पोनी बांधा. त्याला आंबाडा जाळी लावा आणि त्या जाळीला सगळ्या बाजुंनी अशा पद्धतीने गजरा लावा. छान दिसाल.
छोट्या केसांचा असा आकर्षक मेसी बनही घालता येतो. घागरा, साडी, लेहेंगा, सलवार कुर्ता अशा कोणत्याही पेहरावावर तो उठून दिसतो.
समोरच्या बाजुने अशा पद्धतीने सागरवेणीप्रमाणे केस पिनअप करा. यापेक्षा थोडे मोठे केस असतील तर पाेनी बांधून त्याला रेडीमेड आंबाडा लावा. छान लूक मिळेल.