केस कायम बांधून ठेवता? केसांचे होईल वाटोळे, न विसरता करा ७ गोष्टी...

Updated:April 12, 2025 19:42 IST2025-04-12T19:27:51+5:302025-04-12T19:42:27+5:30

7 Hair Care Tips For Women Who Tie Hair Daily : Amazing Hair Care Routine for Women Who Tie Hair Daily : जर तुम्ही देखील केसांची कायम वेणी-आंबाडा घालता, करा ७ गोष्टी - केसांना घेऊ द्या मोकळा श्वास..

केस कायम बांधून ठेवता? केसांचे होईल वाटोळे, न विसरता करा ७ गोष्टी...

आपण सगळेच आपल्या केसांची योग्य ती काळजी घेतो. केस एकमेकांत (Amazing Hair Care Routine for Women Who Tie Hair Daily) गुंतू नयेत किंवा खराब होऊ नये म्हणून आपण काळजीपूर्वक केस बांधून ठेवतो. आपल्यापैकी काहीजणी अशा आहेत ज्या केस कायमच (7 Hair Care Tips For Women Who Tie Hair Daily) बांधून ठेवतात.

केस कायम बांधून ठेवता? केसांचे होईल वाटोळे, न विसरता करा ७ गोष्टी...

कधी केसांची वेणी तर कधी आंबाडा घालतो. परंतु कायम अशा पद्धतीने केस बांधून ठेवल्याने केस आणि स्काल्पशी संबंधित अनेक समस्या हैराण करतात. यासाठीच तुम्ही देखील दिवसभर केस बांधून ठेवत असाल तर, केसांचे आरोग्य व सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी या ७ गोष्टी कराच.

केस कायम बांधून ठेवता? केसांचे होईल वाटोळे, न विसरता करा ७ गोष्टी...

१. केस बांधण्यासाठी रबर बँड चुकूनही वापरु नका. नेहमी कापडी किंवा सॅटिन कापडाच्या रबर बँडचाच वापर केस बांधण्यासाठी करावा. यामुळे केसांत गुंता होऊन केस तुटत नाहीत.

केस कायम बांधून ठेवता? केसांचे होईल वाटोळे, न विसरता करा ७ गोष्टी...

२. केस अगदी ओढून - ताणून गच्च बांधू नका. केस थोडे सैलच बांधावेत. जर तुम्ही दिवसभरासाठी केस बांधून ठेवणार असाल तर केस थोडे सैलच बांधवेत. ओढून बांधल्याने केस आणि स्काल्पवर ताण येऊन केस तुटू शकतात, तसेच केसांच्या अनेक समस्या सतावतात.

केस कायम बांधून ठेवता? केसांचे होईल वाटोळे, न विसरता करा ७ गोष्टी...

३. ठराविक दिवसांनी केसांचा भांग सतत बदलत राहा. एकाच दिशेने सतत भांग पाडल्याने केस एकाच दिशेने खेचले जाऊन केसांवर ताण येऊ शकतो. यामुळे काही दिवसांनी भांग बदलत राहा.

केस कायम बांधून ठेवता? केसांचे होईल वाटोळे, न विसरता करा ७ गोष्टी...

४. केसांची खालची टोक कायम कोरडी, रुक्ष, निस्तेज असतात. यामुळे केस बांधण्यापूर्वी केसांच्या खालच्या टोकांना हेअर सीरम, तेल किंवा हेअर जेल लावून मसाज करावा.

केस कायम बांधून ठेवता? केसांचे होईल वाटोळे, न विसरता करा ७ गोष्टी...

५. ओले केस चुकूनही बांधू नका. जर केस धुतले असतील आणि ते ओले असतील तर आधी ते व्यवस्थित संपूर्णपणे सुकवून घ्यावे. केस सुकल्यानंतरच बांधावेत.

केस कायम बांधून ठेवता? केसांचे होईल वाटोळे, न विसरता करा ७ गोष्टी...

६. केस कायम बांधूनच ठेवू नका. शक्य असल्यास दिवसातील काही तास केस मोकळे ठेवा. यामुळे केस आणि स्काल्पवरील ताण कमी होण्यास मदत मिळते.

केस कायम बांधून ठेवता? केसांचे होईल वाटोळे, न विसरता करा ७ गोष्टी...

७. झोपताना केस मोकळे ठेवून झोपण्याची चूक करु नका. यामुळे केसांचा गुंता होऊ शकतो. यासाठी झोपताना केसांची लूज वेणी किंवा बन घालावा.