8 attractive hair styles for traditional look, best festive exercise, diwali special exercise
Diwali : लक्ष्मीपूजन ते भाऊबीज-दिवाळीत करा ८ सुंदर हेअरस्टाईल, सोप्या आणि झटपट-दिसाल सुंदरPublished:October 25, 2024 01:24 PM2024-10-25T13:24:32+5:302024-10-25T17:45:12+5:30Join usJoin usNext दिवाळीच्या कपड्यांची खरेदी झाली असेल तर आता आपण त्या कपड्यांवर कशी हेअरस्टाईल करणार आहोत, याचा विचारही करून ठेवा. कारण तुमची हेअरस्टाईल कशी आहे, यावर तुमचा लूक खूप जास्त अवलंबून असतो. त्यासाठीच बघा या काही टिप्स... साडी नेसणार असाल किंवा एखादा घागरा घालणार असाल तर अशी साधी सोपी हेअरस्टाईल करू शकता. एका बाजुने खरं किंवा आर्टिफिशियल फूल लावा आणि केस सेट करा. साडी न नेसता इतर कोणतेही ट्रॅडिशनल कपडे घालणार असाल आणि तुमचे केस जर थोडे कुरळे असतील तर अशा पद्धतीने मधोमध केसांचा भांग पाडून बिंदी लावा.. सुंदर दिसाल.. तुमचे केस जर थोडे वेव्ही प्रकारातले असतील तर अशा पद्धतीने एका बाजुने केस पिनअप करून बाकी केस मोकळेही सोडू शकता. काठपदर साडी नेसणार असाल तर अशी एखादी हेअरस्टाईल करा. मस्त ट्रॅडिशनल लूक मिळेल. अशी साधी हेअरस्टाईल कोणत्याही ड्रेसिंगवर छानच दिसते. थोडा इंडोवेस्टर्न लूक करणार असाल तर अशा पद्धतीची हेअरस्टाईल करा. तुमचा लूक आणखी उठून दिसेल. हल्ली अशा बऱ्याच हेअर ॲक्सेसरीज दुकानात किंवा ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळतात. त्यांचा वापर करूनही अशी साधी पण आकर्षक हेअरस्टाईल करता येईल. खोपा पिन लावून केलेली ही हेअरस्टाईल दिसायला अतिशय आकर्षक आहे. शिवाय अवघ्या २ मिनिटांत ती होऊ शकते. टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीफॅशनदिवाळी 2024Beauty TipsHair Care TipsfashionDiwali