वयाच्या तिशीनंतर खालावते ‘कोलेजन’ची पातळी, त्वचा दिसते म्हातारी; खा ८ गोष्टी-दिसा कायम तरुण...
Updated:January 28, 2025 15:47 IST2025-01-28T15:17:56+5:302025-01-28T15:47:21+5:30
8 Collagen Building Nutrients For Younger Skin After 30 : Top 8 Anti-Aging Foods to Help You Look Younger : त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी 'कोलेजन' तयार करण्यात मदत करणारे ८ पोषक पदार्थ...

'कोलेजन' हे आपल्या शरीरात असणारे एक प्रकारचे (8 Collagen Building Nutrients For Younger Skin After 30) प्रथिनच आहे. जे त्वचा, हाडे, सांधे तसेच इतर ऊतींना ताकद आणि लवचिकता देण्याचे मुख्य कार्य करते. त्वचा तजेलदार आणि तरुण ठेवण्यात या 'कोलेजन' ची सर्वात महत्वाची भूमिका असते.
वाढत्या वयाबरोबर शरीरातील कोलेजनचे उत्पादन (Top 8 Anti-Aging Foods to Help You Look Younger ) कमी होऊ लागते, त्यामुळे त्वचा सैल होते आणि त्वचेवर सुरकुत्या पडू लागतात. असे काही पदार्थ असतात जे आपल्या शरीरात 'कोलेजन'ची निर्मिती करण्यास मदत करतात. हे पदार्थ महिलांनी वयाच्या तिशीनंतर आवर्जून रोजच्या आहारात खायलाच हवेत. ते पदार्थ कोणते ते पाहूयात.
१. व्हिटॅमिन 'सी' युक्त फळे :-
संत्री, लिंबू, किवी आणि स्ट्रॉबेरी यांसारखी फळे व्हिटॅमिन 'सी' चे चांगले स्रोत आहेत. 'कोलेजन' तयार करण्यासाठी व्हिटॅमिन 'सी' आवश्यक असते.
२. हिरव्या पालेभाज्या :-
पालक, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि इतर अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. जे कोलेजनच्या उत्पादनास प्रोत्साहन देतात आणि त्वचेचे संरक्षण करतात.
३. बिया आणि नट्स :-
चिया सीड्स, अळशीच्या बिया, बदाम आणि अक्रोड अशा बिया आणि नट्स ओमेगा - ३ फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन 'ई' चे समृध्द स्रोत आहेत, जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात.
४. टोमॅटो :-
टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, जे एक अँटिऑक्सिडेंट आहे आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते. याचबरोबर शरीरात 'कोलेजन' तयार करण्यासाठी देखील मदत करते.
५. ओवा :-
ओव्यामध्ये सिलिकॉन असते, जे कोलेजनच्या उत्पादनास मदत करते.
६. कडधान्ये :-
मुग, हरभरा, आणि मसूर यांसारखी कडधान्ये प्रथिनांनी भरलेली असतात. हे त्वचेला मजबूती देऊन कोलेजन वाढवतात.
७. गाजर :-
गाजर जीवनसत्त्व 'ए' ने समृद्ध असे असते. हे त्वचेसाठी अत्यंत उपयुक्त असून कोलेजन तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
८. बेरी फळे :-
स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, आणि रासबेरी यासारख्या फळांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे त्वचेला फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण देतात आणि कोलेजन उत्पादनाला चालना देतात.