लिपस्टिक लावताना नकळत तुम्हीही हमखास करता ९ चुका; परफेक्ट लिपस्टिक कशी लावायची?

Published:February 15, 2023 02:29 PM2023-02-15T14:29:47+5:302023-02-15T15:01:05+5:30

Common Mistakes To Avoid While Lipstick Applying : लिपस्टिक अनेकजणी रोज लावत असल्या तरी परफेक्ट लिपस्टिक कशी लावायची याचं तंत्र शिकून घ्यायला हवं.

लिपस्टिक लावताना नकळत तुम्हीही हमखास करता ९ चुका; परफेक्ट लिपस्टिक कशी लावायची?

योग्य पद्धतीने लिपस्टिकचा वापर केल्यास आपले सौंदर्य नक्कीच खुलून दिसेल. महिलांच्या बॅगमध्ये भलेही मेकअप किट नसलं तरीही त्यांच्याकडे लिपस्टिक मात्र नक्कीच असते. कारण लिपस्टिकमुळे महिलांच्या सौंदर्यांत भर पडते. ही लिपस्टिक जास्त उठावदार दिसावी आणि दीर्घकाळ टिकून रहावी यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते. महिलांकडून लिपस्टिक लावताना काही लहानशा चुका वारंवार केल्या जातात. काय आहेत या चुका आणि त्या टाळल्यास आपला लूक कसा जास्त चांगला होईल यासाठी काही खास टिप्स(Common Mistakes To Avoid While Lipstick Applying).

लिपस्टिक लावताना नकळत तुम्हीही हमखास करता ९ चुका; परफेक्ट लिपस्टिक कशी लावायची?

मेकअप करताना कोणतीही गोष्ट जास्त लावल्याने आपला लूक बिघडू शकतो. त्यातच लिपस्टिक जास्त प्रमाणात लागली तर चेहरा विद्रूप दिसू शकतो. त्यामुळे लिपस्टिक योग्य त्या प्रमाणातच लावायला हवी. उगाच प्रमाणापेक्षा जास्त लिपस्टिक ओठांवर रगडू नये.

लिपस्टिक लावताना नकळत तुम्हीही हमखास करता ९ चुका; परफेक्ट लिपस्टिक कशी लावायची?

जास्त कोरड्या लिपस्टिक वापरणे टाळा. कोरड्या लिपस्टिकचा वापर ओठांवर केल्याने आपले ओठदेखील कोरडे दिसू शकतात.

लिपस्टिक लावताना नकळत तुम्हीही हमखास करता ९ चुका; परफेक्ट लिपस्टिक कशी लावायची?

लिपस्टिक ओठांना लावल्यानंतर ती योग्य पद्धतीने सेट होणे आवश्यक असते. त्यासाठी ती लावल्यानंतर ओठ एकमेकांवर योग्य पद्धतीने फिरवावेत. किंवा टीश्यू पेपरने ओठांवर हलकासा दाब द्यावा. त्यामुळे लिपस्टिक चांगली लागण्यास मदत होते.

लिपस्टिक लावताना नकळत तुम्हीही हमखास करता ९ चुका; परफेक्ट लिपस्टिक कशी लावायची?

हिवाळ्यात आपले ओठ जास्त कोरडे पडून ओठ फाटण्याची समस्या उदभवते. अशावेळी कोरड्या ओठांवर लिपस्टिक लावण्याआधी ओठांवर लिप बाम लावायला विसरू नका.

लिपस्टिक लावताना नकळत तुम्हीही हमखास करता ९ चुका; परफेक्ट लिपस्टिक कशी लावायची?

कधीकधी घाईत मेकअप करताना लिपस्टिक दातांना लागण्याची शक्यता असते. त्यामुळे लिपस्टिक लावताना काळजीपूर्वक लावावी. लिपस्टिक लावून झाल्यावर आणि मेकअप झाल्यावरही एकदा आरश्यात पाहून मेकअप योग्य झाला आहे की नाही ते पहावे.

लिपस्टिक लावताना नकळत तुम्हीही हमखास करता ९ चुका; परफेक्ट लिपस्टिक कशी लावायची?

इतर सर्व गोष्टींप्रमाणेच लिपस्टिकलाही एक्सपायरी डेट असते. त्यामुळे आपली लिपस्टीक जास्त जुनी झाली असल्यास ती ओठांवर चांगल्या पद्धतीने खुलून येत नाही. त्यामुळे चांगल्या लूकसाठी फार जुनी लिपस्टिक वापरणे टाळावे.

लिपस्टिक लावताना नकळत तुम्हीही हमखास करता ९ चुका; परफेक्ट लिपस्टिक कशी लावायची?

काहीजण ओठांवर गडद लिप लाइनरसह लिपस्टिकचे कोट पुन्हा पुन्हा लावतात. पण असे लावल्याने आपला मेकअप बिघडू शकतो लिपस्टिकमध्ये फक्त सॉफ्ट टेक्श्चर लावणे चांगले दिसते.

लिपस्टिक लावताना नकळत तुम्हीही हमखास करता ९ चुका; परफेक्ट लिपस्टिक कशी लावायची?

लिपस्टिक निवडताना ती उत्तम दर्जाची असेल याची जरुर काळजी घ्यावी. ओठांसारख्या अतिशय नाजूक अशा भागांवर आपण लिपस्टिक लावत असतो. त्यामुळे जर लिपस्टिक ही चांगल्या दर्जाची नसेल तर त्याचा परिणाम थेट ओठांवर होऊ शकतो.

लिपस्टिक लावताना नकळत तुम्हीही हमखास करता ९ चुका; परफेक्ट लिपस्टिक कशी लावायची?

लिपस्टिक लावण्याआधी सुरुवातीला लिप पेन्सिलने डार्क रंगाची आउटलाइन किंवा शेड बनवून घ्या. यामुळे ओठांचा आकार व्यवस्थित दिसतो. त्यामुळे आपली लिपस्टिक ही खूपच जास्त आकर्षक दिसते.