आलिया भट आणि सोनम कपूरचे स्मार्ट प्रेग्नन्सी लूक! ५ टिप्स, प्रेग्नन्सीतही दिसता येतं आकर्षक- ग्लॅमरस
Updated:August 9, 2022 21:25 IST2022-08-09T21:20:55+5:302022-08-09T21:25:33+5:30

१. प्रेग्नन्सी म्हणजे स्वत:च्या दिसण्याकडे दुर्लक्ष... आता काय तब्येत तर बेढब होणारच, म्हणून मग दिसण्याकडेही लक्ष द्यायचं नाही, असा ट्रेण्ड काही वर्षांआधीपर्यंत होता. पण आता मात्र तो ट्रेण्ड बदलतो आहे... प्रेग्नन्सीतही स्मार्ट, सुंदर दिसता येतं असा विश्वास अनेकींना वाटतो आहे.
२. अशातच अभिनेत्री आलिया भट, सोनम कपूर यांचे प्रेग्नन्सीमधले ग्लॅमरस लूकही कमालीचे आकर्षक ठरत आहेत. त्यांचंही पोट सुटतंय, त्यांनाही सर्वसामान्य स्त्रियांना होतो, तसा त्रास गर्भारपणात होतच असणार. पण तरीही तो त्रास सहन करत फ्रेश कसं दिसायचं, टापटीप कसं रहायचं, याचं उत्तम उदाहरण त्या दोघी सेट करत आहेत. त्याच दोघी नाही, तर एकंदरीतच अनेक बॉलीवूड अभिनेत्रींचे प्रेग्नन्सी लूक खरोखरंच बघण्यासारखे आहेत.
३. बेबी बम्प एकदा वाढू लागले की कपड्यांची फिटिंग बदलून जाते. काही वर्षांपुर्वी तर अंगात कोंबून कपडे घातले आहेत, असा फिल गर्भवती महिलांकडे पाहून यायचा. पण आता मात्र बेबी बम्प लवकर दिसू नयेत, म्हणून अनेक आकर्षक कपडे बाजारात उपलब्ध आहेत. आता हेच बघा आलियाचा हा ड्रेस तिला छान दिसतोच आहे, पण त्यासोबतच तिचा पोटाचा वाढता आकारही व्यवस्थित झाकला गेला आहे.
४. प्रेग्नन्सीतही कसं ग्लॅमरस आणि आकर्षक दिसता येतं, याचं आलियाने दाखवलेलं हे आणखी एक लूक. तिचा ड्रेस कमालीचा ट्रेण्डी आहेच. पण त्यासोबतच तिची सध्याची जी अवस्था आहे, त्यातही तो बरोबर सूट होणारा आहे.
५. आलियाचा कफ्तान टॉप लूकही चांगलाच गाजला होता. सैलसर लूक देणारे असे टॉप, वनपीस, बाजारात उपलब्ध आहेत. गर्भवती महिला या प्रकारच्या ड्रेसेसचा चांगला उपयोग करू शकतात. यामुळे पोटही खूप दिसणार नाही आणि या कपड्यांमध्ये आरामदायीही वाटेल.
६. सोनम कपूरने तर बेबी बम्प दाखवत प्रेग्नन्सीतही जबरदस्त फोटो शूट केलं. पण तिने घातलाय तसा या पद्धतीचा ड्रेसही तुम्हाला अतिशय कुल आणि ट्रेण्डी लूक देऊ शकतो.