हाय रे तेरा झुमका !! 'गंगुबाई'च्या प्रमोशनसाठी आलिया भटने घातलेले एकसेएक झुमके पाहा.. कानातल्यांची क्रेझ असेल तर.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2022 1:15 PM 1 / 9१. गंगुबाई काठियावाडी या चित्रपटामुळे आलिया भट सध्या जबरदस्त चर्चेत आहे.. तिचा गेटअप, तिचा लूक, प्रोमोशनसाठी तिने नेसलेल्या साड्या, यासोबतच चर्चा होत आहे ती तिच्या झुमक्यांची.....2 / 9२. गंगुबाई या चित्रपटातील भुमिकेनुसार आलियाने तिच्या प्रमोशनसाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्यांची निवड केली होती. त्यामुळे ती बऱ्याचदा पांढऱ्या साडीतच दिसली... तिच्या साड्यांची आणि ॲक्सेसरीजची जबरदस्त चर्चा रंगलेली होती..3 / 9३. पांढऱ्या साडीच्या काठांवर सोनेरी थ्रेडवर्क असल्याने या लूकसाठी आलियाने केलेले झुमके खरोखरंच खास दिसत होते. या तिच्या झुमक्यांनाही सोनेरी बॉर्डर होती, त्यामुळे ते स्पेशली साडीसाठी डिझाईन केल्याचे वाटत होते. आलियाचे हे झुमके डिझायनर असले तरी लोकल मार्केटमध्ये १५० ते २०० रूपयांपर्यंत असे झुमके मिळू शकतात.4 / 9 ४. ऑक्सिडाईज प्रकारात असणारे आलियाचे हे कानातले खरोखरंच तिला क्लासी लूक देणारे आहेत. एखाद्या सुंदर फुलाप्रमाणे असणारे हे कानातले साडीसोबतच पंजाबी सूट, लेहेंगा यावरही खुलून दिसतात. 5 / 9५. मोत्याचे कानातले तर कधीही एव्हरग्रीनच दिसतात. असंच आलियाच्या या कानातल्यांचं. तिचे हे मोत्याचे मोठाले कानातले, तिला खूपच शोभून दिसत आहेत. हे कानातले तिने फॉर्मल कपड्यांवर घातले आहेत.... पण साडी किंवा एखाद्या ट्रॅडिशनल कपड्यांवरही हे कानातले तेवढेच सुंदर दिसतील. यासारखेच दिसणारे कानातले ५०० ते ६०० रूपयांपर्यंत लोकल मार्केटमध्ये मिळू शकतात.6 / 9६. स्टोन आणि डायमंड यांचा वापर करून मढवलेले आलियाचे हे कानातले अतिशय नाजूक आणि सुंदर आहेत... आलियाच्या न्यूड मेकअप लूकला या कानातल्यांनी चार चाँद लावले आहेत... असे कानातले आपल्याला १ ते दिड हजार रूपयांदरम्यान मिळू शकतात. 7 / 9७. आलियाने घातले आहेत, तसे मोठे ऑक्सिडाईज झुमके आपण फक्त नवरात्रीच्या ट्रॅडिशनल ड्रेसवर घालण्यासाठीच बाजूला ठेवतो. पण साडी किंवा इतर ट्रॅडिशनल कपड्यांवर असे झुमके ट्राय करायला हरकत नाहीत. 8 / 9८. मोती आणि डायमंड यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन असणारे कानातले खूपच क्वचित दिसतात. त्यापैकीच एक आहेत आलियाचे हे टॉप्स. फुलांच्या आकाराचं डिझाईन असणारे हे टॉप्स नाजूक कानातले आवडणाऱ्यांच्या विशेष पसंतीस उतरतील.9 / 9९. मोठमोठाले, हेवी कानातले आवडत असतील, तर आलियाच्या या कानातल्यांचा विचार तुम्ही नक्कीच करू शकता. तुमची ड्रेसिंग पारंपरिक प्रकारातली कोणतीही असली तरी फक्त एवढे एक कानातले त्यावर घालून तुम्हाला कम्प्लिट लूक मिळू शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications