Join us   

रोज १० मिनिटं हे काम करा, १६ वर्षांनी लहान दिसाल; डॉक्टरांनी सांगितलं तरूण दिसण्याचं सिक्रेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 1:41 PM

1 / 6
आपण नेहमी तरूण, ग्लोईंग दिसावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण जेव्हा तुम्ही फिट हेल्दी दिसता तेव्हा काहीही करण्याचा आत्मविश्वास तुमच्यात असतो. डॉक्टर वरलक्ष्मी यांनी त्वचा दीर्घकाळ तरूण, ग्लोईंग ठेवण्यासाठी काही एंटी एजिंग टिप्स सांगितल्या आहेत. (Anti Aging Skin Tips)
2 / 6
शारीरिकशक्ती कमी झाल्यानं त्वचेवर सुरकुत्या येतात. डोक्यावरचे केस पांढरे होतात. याशिवाय हाय बीपी, डायबिटीज, कोलेस्ट्रेरॉल यांसारखे आजारही उद्भवतात. जागतिक आरोग्य संघटनेच्यामध्ये त्वचेच्या या स्थितीला मोलेक्युअर आणि सेलुलर डॅमेज जबाबदार असते.
3 / 6
आयुर्वेदाच्या डॉक्टर वरलक्ष्मी यांनी अलिकडेच समोर आलेल्या एका अभ्यासाचा हवाला देत सांगितल की रोज १० मिनिटं वेगानं चालल्यास तुमचं वय १६ वर्षांनी कमी दिसू शकतं. (Anti Aging Exercise) वॉकिंग एक्सरसाईज वयस्करपणा दूर ठेवण्यास मदत करते.
4 / 6
हा अभ्यास ४ लाखांपेक्षा जास्त लोकांवर करण्यात आला होता. यामध्ये हळूहळू चालणाऱ्यांच्या तुलनेत वेगानं चालणाऱ्यांमध्ये वय वास्तविक वयापेक्षा १६ वर्षांनी कमी दिसत होते. डॉ. वरलक्ष्मी म्हणाल्या की या अभ्यासात ल्यूकोसाईट पेशींच्या टेलोमेरची लांबी वेगानं चालणाऱ्या लोकांमध्ये जास्त असल्याचं दिसून आलं.
5 / 6
जे आपल्या जन्माच्या काळाच्या आधारावर चालते, ते कालक्रमानुसार युग आहे. तर, शरीराच्या पेशी आणि ऊतींचे वय जैविक वय म्हणतात. पर्यावरण आणि इतर कारणांमुळे होणारे नुकसान हे वय वाढण्याचं कारण ठरतं. हे वय कालक्रमानुसार ओलांडले की, म्हातारपणाची लक्षणे लहान वयातच दिसू लागतात.
6 / 6
वेगानं चालल्यास अनेक फायदे मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे वेगानं चालल्यावर धुम्रपानाची इच्छा कमी होते, कोलेस्टेरॉल वाढत नाही, हाय बीपीच्या औषधांपासून सुटका, शारीरिक गतिशिलता वाढते.
टॅग्स : त्वचेची काळजीब्यूटी टिप्स