अनुष्का शर्मा ते अंकिता लोखंडे, सेलिब्रिटींच्या लग्नात 'बनारसी साडीचे' जलवे; बघा बनारसी साडीचे सुंदर प्रकार By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2022 7:04 PM 1 / 8१. अनुष्का शर्मापासून ते अगदी लेटेस्ट अंकिता लोखंडेपर्यंत सगळ्याच सेलिब्रिटींना बनारसीचा मोह होतोच.. बहुतेक सगळ्या महिलांनाच आकर्षित करणाऱ्या या बनारसी साडीचा जन्म मुघल काळाच्याही आधीचा असल्याचं मानलं जातं. 2 / 8२. मुघल बादशाह अकबराच्या आधी बनारसी वस्त्र हे केवळ राजघराण्यांतल्या लोकांपर्यंतच मर्यादित असायच. पण बादशाह अकबराने मात्र ते राजघराण्यापासून सर्वसामान्यांच्या घरापर्यंत आणलं. त्याने हे वस्त्र विणणाऱ्या कारागिरांना वाराणसीला आणलं. तिथं त्यांच्यासाठी अनेक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या आणि त्यांच्या व्यवसायाला, कलेला प्रोत्साहन दिलं. 3 / 8३. जरीच्या धाग्याने विणलेली बुटी हे बनारसी साडीचं वैशिष्ट्य आहे. आता त्यामध्ये अनेक बदल करण्यात आले असून फुले, पाने, बेलबुटी अशा बऱ्याच नक्षीही बनारसी साडीमध्ये बघायला मिळतात. साडीच्या डिझाईनवरून बनारसी साडीत आता बुटी, बुटा, बेल, झालर, जाल असे प्रकार पडले आहेत. 4 / 8४. पारंपरिक बनारसी साडीसोबतच आता बनारसी साडीमध्ये ब्रायडर साडी, डिझायनर साडी, जरी मोटिफ, डिजिटल प्रिंट, क्रेप बनारसी, कॉटन जेकॉर्ड, बनारसी नेट, बनारसी जाल साडी असे अनेक प्रकारही बनारसी साडीमध्ये उपलब्ध आहेत.5 / 8५. अस्सल बनारसी साडीची किंमत कमीतकमी ५ हजार असते.. अगदी १ लाखापर्यंतही बनारसी साड्या मिळतात. ज्याप्रमाणे पैठणीचा काठ पाहून पैठणीचे परीक्षण केले जाते, त्याचप्रमाणे बनारसी साडीची बेल- बुटी पाहून बनारसी साडीची पारख करतात. 6 / 8६. बनारसी साडीची चमक टिकून रहावी यासाठी ती नेहमी एखाद्या सुती कपड्यात गुंडाळून ठेवावी...7 / 8७. साडीची घडी वारंवार बदलत रहावी. अन्यथा साडी चिरली जाऊ शकते. वर्षानुवर्षे साडी नेसणं झाली नाही, तर वर्षातून दोनदा तरी साडीची घडी पुर्णपणे उघडावी आणि ते घरात पसरून ठेवावी. 8 / 8८. बनारसी साडीच्या काठांवर कधीही अत्तर, परफ्यूम मारू नये. अन्यथा साडीचा जर काळा पडण्याची शक्यता असते. आणखी वाचा Subscribe to Notifications