केस धुतले की घरभर गळतात? शॅम्पू लावण्याआधी 'हा' पांढरा पदार्थ लावा; मऊ-दाट होतील केस By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 1:16 PM 1 / 7 ऊन आणि घामामुळे केसांचे बरेचसे नुकसान होतो. याच कारणामुळे डोक्यावरचे पोर्स ब्लॉक होतात आणि केस कमकुवत होऊन गळू लागतात. जास्त कोंडा झाल्यामुळे केस डल आणि ड्राय होतात. 2 / 7केस गळण्याचा त्रास कमी करण्यासाठी तुम्ही फ्रिजमध्ये ठेवलेल्या दुधाचा वापर करू शकता. दूधात अनेक न्युट्रिएंट्स असतात. ज्यामुळे त्वचा आणि केस चांगले राहण्यास मदत होते. अंघोळीच्या आधी तुम्ही केसांना दूध लावले तर केसांना भरपूर फायदे मिळतील.3 / 7सगळ्यात आधी २ ग्लास दूध घ्या. केस व्यवस्थित विंचरून घ्या आणि केसांच्या मुळांना या दूधाने मसाज करा. केसांमध्ये हे दूध व्यवस्थित लावलं जाईल याची काळजी घ्या. नंतर अर्ध्या तासाने माईल्ड शॅम्पूने केस स्वच्छ धुवा आणि नंतर सुकवून घ्या. 4 / 7एक ग्लास कच्चं दूध घ्या. त्यानंतर हे दूध एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. नंतर केसांच्या मुळांना व्यवस्थित दूध लावा. हलक्या हाताने मसाज करा आणि केस घट्ट बांधून घ्या अर्ध्या तासाने केस स्वच्छ धुवून घ्या. 5 / 7यातील हेल्दी फॅट्स केसांना मुलायलम बनवतात आणि ड्रायनेस दूर होतो. दूधातील बायोटीन केसांना हेल्दी बनवतात ज्यामुळे केसांची ग्रोथ चांगली होते. केसांचे पोर्स उघडतात त्यामुळे केस दाट होतात. 6 / 7नियमित केस धुण्याआधी दूध लावल्याने केसांचे वॉल्यूम चांगले राहते. यात लॅक्टीक एसिड असते ज्यामुळे ड्रड्रॅफची समस्या उद्भवत नाही.7 / 7 तुम्ही दूध, केळ्याची पेस्ट बनवून केसांना लावू शकता. अर्धा तास तसंच ठेवून केसांना शॅम्पूने स्वच्छ धुवा. केस मुलायम, दाट आणि हेल्दी राहतात. आणखी वाचा Subscribe to Notifications