Join us   

हिवाळ्यात कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी आयुर्वेदिक उपाय, त्वचा होईल मऊ- मुलायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2022 8:15 AM

1 / 7
१. हिवाळा सुरू झाला की त्वचेचा कोरडेपणा वाढू लागतो. त्वचा उलते, रखरखीत होते. त्यासाठी आपण त्याला वेगवेगळे क्रिम लावून मॉईश्चराईज करतो. पण घरच्याघरी करता येण्यासारख्या काही आयुर्वेदिक उपचारांच्या माध्यमातूनही त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी निश्चितच मदत होऊ शकते.
2 / 7
२. अभ्यंग म्हणजेच संपूर्ण शरीराची तेलाने मसाज केल्याने या दिवसांत खूप फायदा होते. मालिश केल्याने तेल शरीरात मुरते आणि त्यामुळे त्वचेला पोषण मिळते. आठवड्यातून एकदा अर्धा ते पाऊण तास संपूर्ण शरीराला मालिश करावी.
3 / 7
३. साबणाऐवजी कडुलिंबाची पावडर, हळदीचा लेप, त्रिफळा लेप लावून आंघोळ करा. आंघोळीनंतर त्वचेला मॉईश्चराईज करा.
4 / 7
४. आहारामध्ये तुपाचा समावेश वाढवावा. हिवाळ्यात धुळीचा त्रास होऊन अनेकांना सर्दी होण्याचे किंवा नाक कोरडे होण्याचे प्रमाण वाढते. हे दोन्ही त्रास कमी करण्यासाठी रोज रात्री झोपताना बोटाला तूप लावून ते दोन्ही नाकपुड्यांमध्ये फिरवा.
5 / 7
५. साय किंवा दूध वापरून आठवड्यातून एकदा अंगाला मसाज करा. त्यानंतर कोणतेही उटणे लावून आंघोळ करा. त्वचेला पेाषण मिळेल तसेच त्वचेचा काळवंडलेपणा कमी होऊन ती चमकदार होईल.
6 / 7
६. थंडी असते म्हणून अनेक जण हिवाळ्यात अगदी कडक पाणी घेऊन आंघोळी करतात. पण खूप कडक पाणी वापरल्यानेही त्वचेच्या वरच्या थराचे नुकसान होते आणि त्वचा आणखीनच कोरडी पडू लागते. त्यामुळे कडक पाण्याने आंघोळ टाळा.
7 / 7
७. रोज रात्री झोपताना चेहऱ्याला आणि ओठांना थोडेसे साजूक तूप लावून त्याने मसाज करा. चेहरा आणि ओठ कोरड पडणार नाहीत.
टॅग्स : त्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजी