उन्हामुळे आग होते- नुसत्या घामाच्या धारा? रामदेव बाबा सांगतात १ उपाय-थंड वाटेल, घाम येणार नाही
Updated:May 21, 2024 16:53 IST2024-05-21T16:39:04+5:302024-05-21T16:53:13+5:30
Baba Ramdev Shares A Tips For Heat Stroke Prevention :

दिवसेंदिवस तापमानात अधिकच वाढ होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत बाहेर पडायचं म्हणलं की खूपच त्रासदायक वाटतं कारण ऊन्हात गेल्यानंतर जास्त काम केले नाही तर खूप थकवा येतो. (Summer Health Tips) चक्कर येणं, घामोळ्या उठणं असे त्रास जाणवतात.
काहींना डायरियाही होत आहे ज्यामुळे गंभीर स्थितीत उद्भवते. यात छोट्या मुलांची संख्या जास्त आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी काही आयुर्वेदीक उपाय सांगितेल आहेत. ज्यामुळे उष्णतेपासून बचाव होण्यास मदत होईल.
ऊन्हाळ्यात पूर्ण कपडे घालून मग बाहेर निघा, उन्हात डोक झाकायला विसरू नका टोपी किंवा स्कार्फची अवश्य वापर करा,
अचानक टेम्परेचर चेंज होणार नाही काळजी घ्या. शरीर काय हायड्रेट ठेवा. उन्हामुळे नाकात कोरडेपणा आला असेल तर नाकात नारळाचं तेल घाला किंवा ऑलिव्ह ऑईल, तूप घाला.
स्किन एलर्जी टाळण्यासााठी एलोवेरा,कडुलिंब, मुल्ताना माती, हळद आणि देशी कापूराचे फेसपॅक चेहऱ्याला लावा.
डोळ्यांमध्ये एलर्जी झाली असेल तर डोळे थंड पाण्याने धुवा, डोळ्यांमध्ये गुलाबपाणी घालायला विसरू नका,
दूध, त्रिफळा आणि तूप खा. भरपूर झोप घ्या, गुळवेलाचा काढा प्या, तुळशीची पानं चावून खा, अनुलोम विलोम हा व्यायाम करायला विसरू नका.