५ चुकांमुळेच कमी वयात चेहऱ्यावर दिसतात सुरकुत्या, चेहरा तरुण- फ्रेश दिसण्यासाठी बघा काय करायचं..

Published:November 3, 2022 03:11 PM2022-11-03T15:11:55+5:302022-11-03T15:22:11+5:30

५ चुकांमुळेच कमी वयात चेहऱ्यावर दिसतात सुरकुत्या, चेहरा तरुण- फ्रेश दिसण्यासाठी बघा काय करायचं..

१. चेहरा तरुण- फ्रेश दिसावा, असं प्रत्येकीला वाटतं. पण आजकाल जसे कमी वयातच केस पांढरे होऊ लागले आहेत, तसेच कमी वयातच अनेकांच्या चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या दिसायला सुरुवात झाली आहे.

५ चुकांमुळेच कमी वयात चेहऱ्यावर दिसतात सुरकुत्या, चेहरा तरुण- फ्रेश दिसण्यासाठी बघा काय करायचं..

२. यामुळे कमी वयातच चेहरा प्रौढ वाटायला लागतो. आवश्यक ती सगळी पोषणमुल्ये आहारातून न मिळणे किंवा त्वचेची योग्य ती काळजी न घेतली जाणे, ही तर यामागची कारणं आहेतच. पण त्याशिवाय आपल्याकडून कळत- नकळत होणाऱ्या चुकाही त्वचेवर अकाली सुरकुत्या येण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.

५ चुकांमुळेच कमी वयात चेहऱ्यावर दिसतात सुरकुत्या, चेहरा तरुण- फ्रेश दिसण्यासाठी बघा काय करायचं..

३. चेहरा धुतल्यानंतर तो सावकाशपणे टिपून घ्यावा. पण अनेक जणी टॉवेल किंवा नॅपकीनने तो खसाखस पुसतात. यामुळेही चेहरा ओढला जातो आणि वारंवार असं झालं की त्वचा सैल होऊन सुरकुत्या येऊ लागतात.

५ चुकांमुळेच कमी वयात चेहऱ्यावर दिसतात सुरकुत्या, चेहरा तरुण- फ्रेश दिसण्यासाठी बघा काय करायचं..

४. तुमची झोपण्याची अवस्था कशी आहे, यावरही सुरकुत्या येणं अवलंबून असतं. जर एका अंगावर झोपून चेहऱ्यावर सलग ४- ५ तास दाब पडत असेल, तरीही अकाली सुरकुत्या येऊ शकतात.

५ चुकांमुळेच कमी वयात चेहऱ्यावर दिसतात सुरकुत्या, चेहरा तरुण- फ्रेश दिसण्यासाठी बघा काय करायचं..

५. सुर्यप्रकाशात जाताना सनस्क्रिन लोशन न लावणे, चेहरा स्कार्फने व्यवस्थित न गुंडाळणे, यामुळे चेहऱ्याला धुळीचा, प्रदुषणाचा वारंवार सामना करावा लागतो आणि मग त्यामुळेही चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात.

५ चुकांमुळेच कमी वयात चेहऱ्यावर दिसतात सुरकुत्या, चेहरा तरुण- फ्रेश दिसण्यासाठी बघा काय करायचं..

६. अनेक जणींना काही ऐकताना किंवा टीव्ही पाहताना सतत चेहऱ्यावर हात ठेवून बसण्याची सवय असते. याचाही चेहऱ्यावर परिणाम होतो.

५ चुकांमुळेच कमी वयात चेहऱ्यावर दिसतात सुरकुत्या, चेहरा तरुण- फ्रेश दिसण्यासाठी बघा काय करायचं..

७. चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येऊ नये, यासाठी दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्या. डिहायड्रेशन झाल्यानेही त्वचेचा ड्रायनेस वाढू शकतो.

५ चुकांमुळेच कमी वयात चेहऱ्यावर दिसतात सुरकुत्या, चेहरा तरुण- फ्रेश दिसण्यासाठी बघा काय करायचं..

८. व्हिटॅमिन सी असणारी फळं खाण्याचं प्रमाण वाढवावं. यात संत्री, मोसंबी, किवी अननस अशी फळं येतात.