५ चुकांमुळेच कमी वयात चेहऱ्यावर दिसतात सुरकुत्या, चेहरा तरुण- फ्रेश दिसण्यासाठी बघा काय करायचं.. By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2022 3:11 PM 1 / 8१. चेहरा तरुण- फ्रेश दिसावा, असं प्रत्येकीला वाटतं. पण आजकाल जसे कमी वयातच केस पांढरे होऊ लागले आहेत, तसेच कमी वयातच अनेकांच्या चेहऱ्यावर बारीकशा सुरकुत्या दिसायला सुरुवात झाली आहे.2 / 8२. यामुळे कमी वयातच चेहरा प्रौढ वाटायला लागतो. आवश्यक ती सगळी पोषणमुल्ये आहारातून न मिळणे किंवा त्वचेची योग्य ती काळजी न घेतली जाणे, ही तर यामागची कारणं आहेतच. पण त्याशिवाय आपल्याकडून कळत- नकळत होणाऱ्या चुकाही त्वचेवर अकाली सुरकुत्या येण्यासाठी कारणीभूत ठरत आहेत.3 / 8३. चेहरा धुतल्यानंतर तो सावकाशपणे टिपून घ्यावा. पण अनेक जणी टॉवेल किंवा नॅपकीनने तो खसाखस पुसतात. यामुळेही चेहरा ओढला जातो आणि वारंवार असं झालं की त्वचा सैल होऊन सुरकुत्या येऊ लागतात.4 / 8 ४. तुमची झोपण्याची अवस्था कशी आहे, यावरही सुरकुत्या येणं अवलंबून असतं. जर एका अंगावर झोपून चेहऱ्यावर सलग ४- ५ तास दाब पडत असेल, तरीही अकाली सुरकुत्या येऊ शकतात.5 / 8५. सुर्यप्रकाशात जाताना सनस्क्रिन लोशन न लावणे, चेहरा स्कार्फने व्यवस्थित न गुंडाळणे, यामुळे चेहऱ्याला धुळीचा, प्रदुषणाचा वारंवार सामना करावा लागतो आणि मग त्यामुळेही चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात.6 / 8६. अनेक जणींना काही ऐकताना किंवा टीव्ही पाहताना सतत चेहऱ्यावर हात ठेवून बसण्याची सवय असते. याचाही चेहऱ्यावर परिणाम होतो.7 / 8७. चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या येऊ नये, यासाठी दररोज ८ ते १० ग्लास पाणी प्या. डिहायड्रेशन झाल्यानेही त्वचेचा ड्रायनेस वाढू शकतो.8 / 8८. व्हिटॅमिन सी असणारी फळं खाण्याचं प्रमाण वाढवावं. यात संत्री, मोसंबी, किवी अननस अशी फळं येतात. आणखी वाचा Subscribe to Notifications