Join us

५० वर्षांची असुनही भाग्यश्रीच्या चेहऱ्यावर तिशीचा ग्लो! कारण साबण, फेसवॉशऐवजी वापरते 'हा' फेसपॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2024 14:44 IST

1 / 8
अभिनेत्री भाग्यश्रीने आता वयाची पन्नाशी पार केली आहे. पण असं असलं तरी तिचा चेहरा मात्र अगदी तिशीतल्या तरुणसारखा तरुण, टवटवीत दिसतो.
2 / 8
त्वचेवर सुरकुत्या तर नाहीच. पण पिंपल्स, ॲक्ने, पिगमेंटेशन असं काहीही नाही. तिची त्वचा एवढी तरुण, चमकदार आणि नितळ असण्याचं कारण म्हणजे ती दररोज लावतो तो एक खास होममेड फेसपॅक.
3 / 8
घरच्याघरी हा फेसपॅक कसा तयार करायचा, याविषयीचा एक व्हिडिओ तिने नुकताच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फेसपॅक तयार करायला अतिशय सोपा आहे. त्यामुळेच आता तो फेसपॅक तयार करण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहा आणि लगेच घरच्याघरी तिने सांगितलेल्या पद्धतीने तो लावायला सुरुवात करा.
4 / 8
अभिनेत्री भाग्यश्री लावते तो फेसपॅक तयार करण्यासाठी आपल्याला केशराच्या ८ ते ९ काड्या, ३ टेबलस्पून कोरफडीचा गर, १ टेबलस्पून प्लेन ओट्स पावडर, व्हिटॅमिन ई च्या २ कॅप्सूल आणि २ टीस्पून गुलाब पाणी असं साहित्य लागणार आहे.
5 / 8
सगळ्यात आधी केशर एखाद्या कागदामध्ये गुंडाळा आणि काही सेकंद गरम तव्यावर ठेवून ते भाजून घ्या.
6 / 8
यानंतर भाजून घेतलेलं केशर आणि वरील सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाका आणि मिक्सर फिरवून त्याची पेस्ट करून घ्या.
7 / 8
ही पेस्ट एखाद्या घट्ट झाकणाच्या काचेच्या डबीत भरून फ्रिजमध्ये ठेवल्यास ती २ आठवडे चांगली राहील.
8 / 8
दररोज हा लेप हलक्या हाताने मसाज करत चेहऱ्याला लावायचा. त्यानंतर १० मिनिटांनी थंड पाण्याने चेहरा धुवून टाकायचा. हा उपाय केल्याने चेहऱ्यावरचे पिंपल्स, पिगमेंटेशन, ओपन पोअर्स कमी तर होतातच. पण सुरकुत्यांचे प्रमाणही कमी होते आणि चेहऱ्यावर खूप छान ग्लो येतो.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीभाग्यश्री