Join us   

Red lipstick tips: आलियासारखी रेड लिपस्टिक लावायची डेअरिंग करायची तर ५ गोष्टी लक्षात ठेवा, दिसा कॉन्फिडन्ट, हॉट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2022 6:12 PM

1 / 7
१. आलियाचा सध्या गंगूबाई काठियावाडी लूक कमालीचा व्हायरल होत आहे.. तिची लाल लिपस्टिक पाहून अनेक जणींनाही तिच्यासारखा ब्राईट रेड शेड लावावा वाटतो.. पण डेअरिंग होत नाही.. कारण लाल लिपस्टिक लावताना थोडीशी जरी चूक झाली तरी तो रंग लगेचच खूप भडक, गाॅडी आणि ओव्हर वाटायला लागतो..
2 / 7
२. त्यामुळेच तर डार्क लिपस्टिक लावायची तर थोडी काळजी घेतली पाहिजे. मुळात लाल रंगाची लिपस्टिक प्रत्येक स्किनटोनला शोभून दिसेल अशी नसते. उजळ आणि गव्हाळ रंगाला लाल रंगाची लिपस्टिक शोभून दिसते. थोडी काळजी घेतली तर सावळ्या वर्णालाही लाल लिपस्टिक चांगली दिसू शकते.
3 / 7
३. लाल रंग हा बऱ्यापैकी ब्राईट असल्याने लग्न- समारंभ किंवा मोठ्या पार्ट्यांसाठीच लाल रंगाची लिपस्टिक राखून ठेवली जाते. या लिपस्टिकमुळे बोल्ड आणि ग्लॅमरस लूक येत असल्याने शक्यतो ती अशा कार्यक्रमांसाठीच ठेवावी. रुटीनमध्ये तिचा वापर सहसा नकोच.
4 / 7
४. एखाद्या कार्यक्रमासाठी तयार होताना लाल लिपस्टिक लावायची असेल तर काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिले पाहिजे. पिवळा, लाल, पांढरा किंवा काळा या रंगांचे कपडे घालणार असाल तर त्यावर लाल लिपस्टिक खूप उठून दिसते.
5 / 7
५. लाल लिपस्टिक लावणार असाल तर ओठांच्या आजूबाजूच्या भागावर फाउंडेशन, कन्सीलर व्यवस्थित लावायला हवं... त्यामुळे ओठांच्या आजूबाजूचा काळवंडलेपणा कमी होईल आणि लिपस्टिक उठून दिसेल.
6 / 7
६. जेव्हा तुम्ही लाल लिपस्टिक लावता, तेव्हा ऑलरेडी तुमचा लूक खूप ग्लॅमरस आणि हेवी होऊन जातो. त्यामुळे लाल रंगाची लिपस्टिक लावत असाल तर खूप जास्त दागदागिणे घालू नका. मोठी टिकली लावू नका. तसेच इतर मेकअप खूप भडक करू नका. कारण लाल लिपस्टिक आणि हेवी मेकअप- हेवी दागिणे हे कॉम्बिनेशन तुम्हाला विचित्र लूक देऊ शकतं..
7 / 7
७. लाल रंगाची लिपस्टिक लावल्यानंतर डोळ्याचा मेकअप अगदी हलका ठेवावा... शक्यतो फक्त आय लायनरची एक बारीक रेघ लावा. काजळ लावले नाही तरी चालते. तसेच टिकलीही छोटीच ठेवा... लाल लिपस्टिक खूप जास्त ग्लॉसी करू नका.
टॅग्स : ब्यूटी टिप्समेकअप टिप्सआलिया भट