benefits of having saffron water for skin, use of saffron for weight loss, how to make saffron water
कमी वयातच चेहरा वयस्कर दिसतो-वजनही वाढलं? प्या केशराचं पाणी, बघा ५ जबरदस्त फायदेPublished:August 5, 2024 01:09 PM2024-08-05T13:09:53+5:302024-08-05T13:18:02+5:30Join usJoin usNext बहुतांश जणी त्यांच्या रोजच्या कामांमध्ये एवढ्या जास्त अडकून गेलेल्या असतात की त्यांना स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळच मिळत नाही. या गोष्टींचा परिणाम मग हळूहळू त्यांच्या सौंदर्यावर आणि आरोग्यावर दिसू लागतो. त्वचा खूपच निस्तेज दिसू लागते. चेहऱ्यावरचा ग्लो गेल्यासारखा वाटतो. त्यामुळे मग कमी वयातच चेहरा वयस्कर दिसू लागतो. तसंच काहीसं वजनाच्या बाबतीत देखील होतं. कितीही प्रयत्न केला तरी वजन वाढतच जातं. म्हणूनच आरोग्य आणि तुमचं सौंदर्य या दोन्ही गोष्टी टिकवून ठेवण्यासाठी दररोज केशर घातलेलं पाणी प्यावं, असा सल्ला आयुर्वेद तज्ज्ञ देत आहेत. (benefits of having saffron water for skin) केशराचं पाणी नियमितपणे प्यायल्यास चयापचय क्रिया उत्तम होते. त्यामुळे शरीरावर अतिरिक्त चरबी साचून राहण्याचं प्रमाण कमी होतं. याचा फायदा वजन कमी होण्यासाठी होतो. (use of saffron for weight loss) मनावरचा ताण कमी करून मूड चांगला करण्यासाठीही केशराचं पाणी पिणं उत्तम मानलं जातं. त्वचेला तरुण ठेवण्यासाठी गरजेचं असणारं कोलॅजिन वाढविण्यासाठीही केशरातील गुणधर्म उपयुक्त ठरतात. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. पावसाळ्याच्या दिवसांत सर्दी- खोकल्याचा त्रास अनेकांना होतो. हा त्रास होऊ नये म्हणून केशराचं पाणी प्यावं, असां सल्ला तज्ज्ञ देत आहेत. हा उपाय करण्यासाठी केशराच्या ४ ते ५ काड्या घ्या आणि त्या १ ग्लास पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. दुसऱ्यादिवशी नाश्ता झाल्यानंतर ते पाणी प्या. किंवा. केशर टाकून पाणी गरम करून घ्या आणि कोमट झालं की प्या. (how to make saffron water?)टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीपाणीहेल्थ टिप्सBeauty TipsSkin Care TipsHome remedyWaterHealth Tips