मुरुम,ओपन पोअर्स आणि ब्लॅकहेड्स होतील कमी, तुळशीच्या पानांचा ' असा ' करा उपयोग, समस्या गायब
Updated:February 16, 2025 16:59 IST2025-02-16T16:56:37+5:302025-02-16T16:59:32+5:30
Beauty hacks: beauty tips: basil leaves benefits: skin care tips: tulsi leaves benefits on skin: tulsi leaves uses for skin: tulsi leaves face pack: pimples open pores treatment: त्वचेवरील मुरुम, डाग आणि कोरडेपणा कमी करायचा असेल तर तुळशीचा फेसपॅक ठरेल बहुगुणी...

लग्नसराईचा काळ असल्यामुळे अनेकांना आपली त्वचा ग्लोइंग आणि सुंदर हवी असते. यासाठी आपण त्वचेवर सतत काहींना काही लावत असतो.
त्वचेवरील मुरुम, डाग आणि कोरडेपणा कसा कमी करता येईल याचा कायम विचार डोक्यात सुरु असतो. (tulsi leaves benefits on skin)
परंतु, आपल्या अंगणात असणारी तुळस जितकी देवघरात वापरली जाते तितकाच तिचा वापर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतो. (tulsi leaves face pack)
तुळशीच्या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स गुणधर्म आहेत. जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात. जर तुमचा चेहरा देखील रखरखीत आणि पिंपल्सने भरलेला असेल तर तुळशीच्या पानांचा यापद्धतीने वापर करुन पाहा.
तुळशीच्या पानांची पावडर तयार करा. त्यात चिमूटभर हळदी, दही, गुलाबजल आणि मध मिसळून पेस्ट तयार करा. आठवड्यातून दोनदा हा पॅक चेहऱ्यावर लावल्याने त्वचा चमकदार आणि तजेलदार दिसते. तसेच पिग्मेंटेशन आणि फ्रिकल्स सारख्या समस्या दूर होतात.
ग्लासभर पाण्यात १० ते १२ तुळशीची ताजी पाने उकळा. पाणी अर्धे झाल्यानंतर ते स्प्रे बाटलीत भरा. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून स्प्रे करा. यामुळे त्वचेला चमक येते.
जर तुम्हाला सारखा मुरुमांचा त्रास होत असेल तर ताज्या तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करुन त्यात चिमूटभर हळदी घाला. मुरुमांवर ही पेस्ट लावा. ज्यामुळे पुरळ जाण्यास मदत होते.
तुळशीच्या पानांच्या पेस्टमध्ये कोरफड जेल मिसळा. रात्री चेहरा धुतल्यानंतर ते चेहऱ्यावर लावा. यामुळे त्वचा चमकदार होईल.
सकाळी तुळशीची पाने चेहऱ्यावर लावल्यास त्वचा स्वच्छ होते. तसेच रोज पाने चावून खाल्ल्याने आरोग्य आणि त्वचा सुधारते.