Best 5 hair oil for fast hair growth, hair care tips for long and strong hair
केसांसाठी सर्वोत्तम असणारे ५ हेअर ऑईल, केस वाढतील भराभर- गळणंही कमी होईलPublished:February 9, 2024 01:10 PM2024-02-09T13:10:10+5:302024-02-09T13:13:15+5:30Join usJoin usNext केसांची चांगली वाढ होत नसेल तर पुढे सांगितलेले काही हेअर ऑईल वापरून पाहा. या तेलांमुळे केसांचं मुळापासून पोषण होईल. त्यामुळे केसांची मुळं पक्की होऊन केस गळणं कमी होईल आणि केसांची चांगली वाढ होईल. यापैकी सगळ्यात पहिलं आहे खोबरेल तेल. खोबरेल तेलामध्ये डोक्याच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरणारे फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात. बदाम तेलामध्ये टोकोफेरॉल नावाचा घटक असतो जो केसांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरतो. कॅस्टर ऑईलमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. जे केसांसाठी आणि डोक्याच्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. केसांना फाटे फुटले असतील, केस कोरडे झाले असतील तर केसांना मॉईश्चराईज करण्यासाठी ग्रेपसीड ऑईल वापरा. व्हिटॅमिन ई आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असणारे अरगन ऑईल वापरल्याने केसांची मुळं पक्की होतात. टॅग्स :ब्यूटी टिप्सकेसांची काळजीBeauty TipsHair Care Tips