केसांसाठी सर्वोत्तम असणारे ५ हेअर ऑईल, केस वाढतील भराभर- गळणंही कमी होईल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2024 1:10 PM 1 / 7केसांची चांगली वाढ होत नसेल तर पुढे सांगितलेले काही हेअर ऑईल वापरून पाहा. 2 / 7या तेलांमुळे केसांचं मुळापासून पोषण होईल. त्यामुळे केसांची मुळं पक्की होऊन केस गळणं कमी होईल आणि केसांची चांगली वाढ होईल. 3 / 7यापैकी सगळ्यात पहिलं आहे खोबरेल तेल. खोबरेल तेलामध्ये डोक्याच्या त्वचेसाठी उपयुक्त ठरणारे फॅटी ॲसिड, व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात. 4 / 7बदाम तेलामध्ये टोकोफेरॉल नावाचा घटक असतो जो केसांची चांगली वाढ होण्यासाठी उपयुक्त ठरतो.5 / 7कॅस्टर ऑईलमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असते. जे केसांसाठी आणि डोक्याच्या त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे.6 / 7केसांना फाटे फुटले असतील, केस कोरडे झाले असतील तर केसांना मॉईश्चराईज करण्यासाठी ग्रेपसीड ऑईल वापरा. 7 / 7व्हिटॅमिन ई आणि ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असणारे अरगन ऑईल वापरल्याने केसांची मुळं पक्की होतात. आणखी वाचा Subscribe to Notifications