1 / 6थंडीच्या दिवसांत त्वचा खूप कोरडी पडते. डोक्याची त्वचाही त्याला अपवाद नाही. त्यामुळे या दिवसांत डोक्यामध्ये जरा जास्तच कोंडा हाेतो.(how to get rid of dandruff?)2 / 6तसंही काही जणांना सततच कोंड्याचा त्रास होतो. त्यांचा हा त्रास हिवाळ्यात तर खूप जास्त वाढतो. त्यामुळे भांग बदलून वेगवेगळ्या हेअरस्टईल करायलाही त्यांना नको वाटते. कारण डोक्यातला कोंडा अधिक स्पष्टपणे दिसतो. शिवाय कोंडा वाढला की डोक्यातही सतत खाज येते.(best home remedies for removing dandruff)3 / 6तुम्हालाही असाच कोंड्याचा त्रास होत असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. हा उपाय करण्यासाठी दोन टेबलस्पून मेथी दाणे घ्या आणि ते मिक्सरमधून फिरवून त्याची थोडी जाडीभरडी पावडर करून घ्या. मेथी दाण्यांमध्ये असणारे फ्लावोनोईड्स आणि सॅपोनिन्स हे दोन ॲण्टीफंगल आणि ॲण्टी बॅक्टेरियल घटक डोक्यातला कोंडा कमी करण्यासाठी मदत करतात. 4 / 6त्यानंतर मेथी दाण्यांची पावडर अर्धा कप दह्यामध्ये ४ तासांसाठी भिजत ठेवा. दह्यामध्ये असणारे लॅक्टोबॅसिलस डोक्यातला कोंडा आणि इतर संसर्ग कमी करण्यासाठी मदत करतात. 5 / 6दह्यात भिजलेली मेथी दाण्यांची पावडर पुन्हा एकदा मिक्सरमधून वाटून घ्या आणि केसांच्या मुळाशी लावा. त्यानंतर अर्धा ते पाऊण तासाने नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. 6 / 6हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा. दुसऱ्यांदा जेव्हा या पद्धतीने केस धुवाल तेव्हा कोंड्याचे प्रमाण बऱ्यापैकी कमी झालेले जाणवेल. शिवाय दही आणि मेथ्या यांच्यामुळे केसांवर छान चमक येईल.