केस धुण्यासाठी 'हे' पाणी वापरा! झाडूसारखे कोरडे केस होतील मऊ- चमकदार, वाढतीलही भराभर By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2024 4:31 PM 1 / 7केस खूप जास्त गळत असतील, तसेच ते खूप कोरडे, रुक्ष झाले असतील तर त्यांच्यामध्ये थोडा मऊपणा आणण्यासाठी तसेच त्यांना मुळापासून मजबूत करण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा.2 / 7हा उपाय नेमका कोणता आणि तो कसा करावा, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ zerowasteadda या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये शाम्पूऐवजी हे एक खास घरी तयार केलेलं मिश्रण वापरूनच केस धुवावे, असा सल्ला दिला आहे.3 / 7हा उपाय करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी २ चमचे मेथी दाणे लागणार आहे. एका पातेल्यामध्ये २ चमचे मेथी दाणे घ्या.4 / 7त्यामध्ये दोन चमचे आवळ्याचे तुकडे आणि दोन चमचे रिठे टाका.5 / 7तसेच त्याच प्रमाणात शिकेकाई घ्या आणि ग्लासभर पाणी घेऊन हे सगळे पदार्थ त्यात चांगले उकळून घ्या. हे पदार्थ जेव्हा १० ते १२ मिनिटे खळखळ उकळून होतील, तेव्हा गॅस बंद करा. 6 / 7यानंतर पाणी थोडं कोमट झालं की सगळे पदार्थ हाताने एकदा चुरून घ्या. त्यानंतर ते पाणी गाळून घ्या. पाण्यात आपोआपच फेस तयार झालेला दिसेल. हे पाणी केस धुण्यासाठी वापरा.7 / 7या पाण्याने केस धुणार असाल तर केसांना खूप तेल लावू नका. कारण नुसत्या याच पाण्याने केस धुतले तर त्यांच्यातलं तेल पुर्णपणे निघून जात नाही. स्ट्रेट आणि मिक्स स्काल्प या प्रकारातल्या केसांसाठी हा उपाय उत्तम असल्याचं सांगितलं आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications