1 / 9आयब्रोज चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यास मदत करतात. आपल्यापैकी बऱ्याचजणींच्या ( 7 simple home remedies to grow thicker eyebrows naturally ) आयब्रोचे केस हे पातळ असतात किंवा दाट - भरीव असे आयब्रो नसतात. अशावेळी आपण आयब्रोला शेप देऊन किंवा आयब्रो पेन्सिलचा वापर करून आयब्रो दाट करु शकतो. परंतु हा उपाय कितीही केला तरीही तो आर्टीफिशियलच झाला. काहीवेळा तर अनेक महिला पातळ आयब्रोज दाट दिसण्यासाठी ब्यूटी ट्रिटमेंट्सही घेतात. परंतु महागड्या ब्यूटी ट्रिटमेंटस घेण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी सोपे उपाय करून आयब्रोजना दाट, भरीव आणि रेखीव करु शकता. 2 / 9जर आपले आयब्रोज पहिल्यापासूनच खूप पातळ (7 Ways to Grow Thicker Eyebrows) असतील तर काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन आयब्रोजना दाट, भरीव आणि अधिक आकर्षक करु शकतो. 3 / 9 हेअर ग्रोथसाठी ऑलिव्ह ऑईल एक उत्तम पर्याय आहे. ऑलिव्ह ऑईलचे ३ ते ४ थेंब कापसात बुडवून आयब्रोजवर ५ ते १० मिनिटांसाठी लावा, नंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. हा उपाय रोज केल्याने आयब्रोच्या केसांची चांगली ग्रोथ होते. 4 / 9हेअर ग्रोथसाठी आणि हेअर फॉलिकल्स मजबूत बनवण्यासाठी एलोवेराचा वापर केला जातो. एलोवेरा जेल नारळाच्या तेलात मिसळून आयब्रोजना लावा. काही वेळाने व्यवस्थित धुवून घ्या. नियमित याचा वापर केल्याने आयब्रोज दाट दिसतील. 5 / 9कांद्याचा रस केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरतो. पण आयब्रोजवर कांद्याचा रस लावल्यास जळजळ होऊ शकते. म्हणून कांद्याच्या रसात मध मिसळून बोटांच्या साहाय्याने आयब्रोजवर लावा. हे मिश्रण डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या. ५ ते १० मिनिटांनी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. या उपायांना आयब्रोजचे केस दाट, उठून दिसतील.6 / 9 दुधात असलेले प्रथिने आणि लॅक्टिक अॅसिड केसांच्या मुळांना पोषण देतात. कापूस दुधात भिजवून आठवड्यातून चार ते पाच वेळा आयब्रोजवर लावल्याने काही दिवसातच आयब्रोजचे केस दाट आणि भरीव दिसतील. 7 / 9खोबरेल तेलात असलेले औषधी गुणधर्म आयब्रोज मुळांपासून मजबूत करतात. सगळ्यांत आधी बोटांवर खोबरेल तेलाचे काही थेंब घ्या आणि ते आयब्रोजला लावा आणि ५ मिनिटे मालिश करा. जर तुम्ही आयब्रोजसाठी खोबरेल तेलाचा वापर रोज केला तर काहीच दिवसांत आयब्रोज सुंदर आकर्षक दिसतील. 8 / 9एरंडेल तेल हे आयब्रोजच्या वाढीसाठी सगळ्यात जास्त सर्वोत्तम मानले जाते. यासाठी कापसाच्या बोळ्यावर एरंडेल तेल घेऊन ते आयब्रोजला लावावे. त्यानंतर हलक्या हाताने आयब्रोजला मसाज करून घ्यावा. २० ते ३० मिनिटांनी धुवा किंवा रात्रभर तसेच राहू द्या. तुम्हाला काही महिन्यांतच आयब्रोजच्या केसांमध्ये जास्त चांगला फरक दिसून येईल. 9 / 9हेअर ग्रोथसाठी तुम्ही रोजमेरी तेलाचा वापर करू शकता. या तेलाने मसाज केल्यास आयब्रो दाट होण्यास मदत होईल. रात्रभर हे तेल आयब्रोजना राहू द्या. सकाळी उठल्यानंतर चेहरा धुवा.