चेहऱ्यावर सारखे पिंपल्स येत असतील तर सगळ्यात आधी 'हे' काम करा, काही दिवसांतच पिंपल्स गायब... By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2024 1:19 PM 1 / 8बऱ्याचदा आपल्या बाबतीत असं होतं की चेहऱ्यावर एकदा पिंपल्स यायला सुरुवात झाली की ते सातत्याने येत राहतात..(how to get rid of pimples?)2 / 8एक गेला की दुसरा पिंपल चेहऱ्यावर हमखास यायला सुरुवात झालेलीच असते. असं होण्यामागचं कारण नेमकं काय आहे ते पाहा3 / 8एका ठिकाणचं दुसऱ्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन पिंपल्स येतात ही गोष्ट तर खरी आहेच. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरात तयार झालेले विषारी घटक..4 / 8त्यामुळेच तुमच्या चेहऱ्यावर सातत्याने पिंपल्स येत असतील तर शरीर डिटॉक्स करण्याची वेळ आता आलेली आहे, हे ओळखून घ्या.5 / 8बॉडी डिटॉक्स करण्यासाठी भरपूर पाणी प्या. जेणेकरून शरीरातले विषारी घटक शरीराबाहेर येण्यास मदत होईल.6 / 8त्याचबरोबर पोटाच्यावर अजिबात खाऊ नका. तेलकट, तुपकट पदार्थ, जंकफूड, प्रोसेस फूड, साखरेचे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा आणि पोटाला आराम द्या.7 / 8याशिवाय जेव्हा चेहऱ्यावर पिंपल्स आलेले असतील तेव्हा दही- दूध यांपासून तयार केलेले कोणतेही लेप चेहऱ्याला लावू नये, अशी माहिती तज्ज्ञांनी merishrushti या इंस्टाग्राम पेजवर केली आहे.8 / 8हे दोन्ही उपाय केले असता चेहऱ्यावरचे पिंपल्स काही दिवसांतच बऱ्याच प्रमाणात कमी झालेले दिसतील. आणखी वाचा Subscribe to Notifications