डोक्यावर पांढरे केसच जास्त चमकतात? झोपण्याआधी नाभीत हे तेल लावा-५ दिवसांत मिळवा काळे केस By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 9:48 AM 1 / 7आपल्या शरीराशी संबंधित सर्व समस्यांचे कारण चुकीची लाईफस्टाईल आणि अयोग्य खाण्यापिण्याची पद्धत आहे. या दोन गोष्टींमुळे चेहऱ्यापासून केसांपर्यंत सर्वच अवयवांवर चुकीचा परिणाम होतो. केस वयाआधीच पांढरे व्हायला सुरूवात होते. (Which oil put on belly bottom for white hairs home remedies)2 / 7वेगवेगळ्या महागड्या क्रिम्स आणि प्रोडक्टचा वापर करून केसांवर तात्पुरता परिणाम दिसून येतो. केसांना काळे-दाट बनवण्यासाठी नाभीत तेल घालण्याचा उपाय करू शकता ५ ते ७ दिवस हा उपाय केल्यास केसांवर चांगला परिणाम दिसून येईल.3 / 7 नारळाचे तेल केसांना फक्त मॉईश्चराईज करत नाही तर केसांना ड्राय होण्यापासूनही रोखते. नियमित या तेलाचा वापर केल्यास केस काळे आणि दाट दिसतात. यासाठी रात्री झोपताना नारळाचे तेल नाभित लावून मग झोपा. 4 / 7आयुर्वेदीक एक्सपर्ट्सच्या मते चंदनाचे तेल केसांशी निगडीत सर्व समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरते. याच्या वापराने पांढरे केस कमी होतात. केसांवर चंदनाचे तेल थेट लावण्यापेक्षा नाभीत चंदनाचे तेल लावा. हा उपाय जास्तीत जास्त फायदेशीर ठरेल. 5 / 7आतापर्यंत तुम्ही अनेक महागड्या उत्पादनांचा वापर केला असेल. पण बदामाच्या तेलाचा वापर करून तुम्ही केसांची पुरेपूर वाढ करू शकता. यात व्हिटामीन ई असते जे केसांना लांब आणि दाट बनवते. रोज रात्री झोपताना हे तेल नाभीवर लावल्यास काही दिवसांतच फरक दिसून येईल.6 / 7मोहोरीचे तेल आजी-आजोबांपासून सर्वचजण वापरतात. हिवाळ्यात या तेलापेक्षा उत्तम कोणतंच तेल नाही. या तेलाच्या वापराने केसांची वाढ चांगली होते. केस वाढवण्यासाठी या तेलाचा वापर फायदेशीर ठरतो. यामुळे केस चमकदार-मऊ आणि मजबूत होतात. 7 / 7केस पांढरे होणं टाळण्यासाठी हिटींग टुल्सचा जास्त वापर करू नका. यामुळे नवीन केसांची वाढ कमी होते आणि उगवलेल्या केसांचा नेसर्गिक रंग कमी होऊ शकतो. आणखी वाचा Subscribe to Notifications