कशाला हवेत महागडे डी- टॅन आणि फेसपॅक? केळीचे साल घेऊन 'हा' उपाय करा- चेहरा चमकेल By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2024 2:22 PM 1 / 6चेहऱ्याची पुरेशी काळजी घेणं झालं नाही तर चेहऱ्यावर टॅनिंग, डेड स्किन वाढत जाते. म्हणूनच वेळोवेळी फेशियल, क्लिनअप, फेसपॅक लावणं अशा काही ब्यूटी ट्रीटमेंट्स घ्याव्या लागतात.(best remedy for glowing skin using banana peel)2 / 6पण या सगळ्या ब्यूटी ट्रीटमेंट्स घेण्यासाठी खूप पैसा लागतो. शिवाय पार्लरमध्ये जाऊन बसायला तेवढा वेळही तुमच्याकडे हवा. म्हणून जर तुमच्याकडे एवढा वेळ नसेल आणि पैसे घालविण्याची इच्छा नसेल तर हा सोपा घरगुती उपाय करून पाहा..(banana face pack for radiant glow)3 / 6हा उपाय करण्यासाठी तुम्हाला केळीची सालं लागणार आहेत. त्यामुळे केळी खा आणि त्याचं सालपट तुमच्या चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी पुढील पद्धतीने वापरून पाहा.4 / 6सगळ्यात आधी तुमचा चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतर केळीचं साल आतल्या बाजूने तुमच्या चेहऱ्यावर चोळा. ७ ते ८ मिनिटं केळीच्या सालीने तुमच्या चेहऱ्याला मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरचे टॅनिंग बऱ्याच प्रमाणात कमी होऊन चेहरा उजळ दिसू लागेल.5 / 6केळीचं साल थोडंसं हातानेच कुस्करून घ्या. त्यामध्ये कॉफी पावडर आणि थोडीशी पिठीसाखर टाका. हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करा आणि ते चेहऱ्यावर चोळा. तुमच्या चेहऱ्याला खूप छान नॅचरल ग्लो देणारा नॅचरल बनाना स्क्रब घरच्या घरी तयार.. 6 / 6केळीचं साल थोडंसं कुस्करून घ्या आणि त्यामध्ये थोडा मध टाका. हा लेप तुमच्या चेहऱ्याला लावा. १० ते १५ मिनिटांनंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. चेहऱ्यावर खूप छान चमक आलेली दिसेल. चेहरा नितळ आणि स्वच्छ होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications