1 / 7केस खूप गळतात किंवा केसांना अजिबातच वाढ नाही म्हणून वैतागला असाल तर हा एक सोपा उपाय घरच्याघरी करून पाहा.2 / 7हा उपाय करण्यााठी आपल्याला फक्त ३ पदार्थ लागणार असून तो कसा करायचा याविषयीची माहिती kailashvati13 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.3 / 7हा उपाय करण्यासाठी सगळ्यात आधी एका काचेच्या बरणीमध्ये १०० ग्रॅम खोबरेल तेल घ्या. केसांना छान मॉईश्चराईज करण्यासाठी आणि केसांवर चमक आणण्यासाठी खोबरेल तेलाचा उपयोग होतो.4 / 7त्यानंतर त्यामध्ये १०० ग्रॅम कॅस्टर ऑईल घाला. केसांची मुळं पक्की करून केस गळणं कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो.5 / 7आता या मिश्रणात बाजारात विकत मिळणाऱ्या रोजमेरी इसेंशियल ऑईलचे १४ ते १५ थेंब टाका. केसांची वाढ होण्यासाठी रोजमेरी ऑईल खूप उपयुक्त ठरते.6 / 7हे तिन्ही तेल व्यवस्थित एकत्र करून त्याने डोक्याला मसाज करा. आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करू शकता. 7 / 7यामुळे अगदी काही दिवसांतच केसांवर खूप छान परिणाम दिसून येईल असं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.