Best Way to Prevent Ageing : पन्नाशीतही पंचवीशीप्रमाणे तरूण, ग्लोईंग दिसाल; 5 टिप्स, सुरकुत्या जराही नाही येणार By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 4:08 PM 1 / 6आपली त्वचा ग्लोईंग असावी आणि त्वचेचा फ्रेशनेस नेहमी टिकून राहावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. जसजसं वय वाढत जातं तसतं त्वचेची चमक आणि ग्लो कमी होऊ लागतो. जर त्वचेची काळजी घेतली नाही तर वाढत्या वयात त्वचेचा उजळपणा कमी होऊ लागतो. (Anti Ageing Tips)2 / 6आजकाल प्रत्येकाच्या लाईफमध्ये ताण तणाव असतो. याचाचा परिणाम म्हणून कमी वयातच त्वचेवर वयवाढीच्या खुणा दिसतात. (Skin care Tips) वयाच्या पन्नाशीतही यंग आणि एर्नेजेटिक राहण्यासाठी काही एंटी ऑक्सिडेंटस् तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. (What is the best way to stop Ageing) याचा वापर करून तुम्ही पन्नाशीतही पंचवीशीप्रमाणे दिसू शकता. (Anti Agening Tips for glowing skin)3 / 6कोरफड घरच्या घरी सहजपणे पिकवता येतो. यामध्ये अनेक प्रकारचे एन्झाइम्स-व्हिटॅमिन असतात जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थेट कोरफडीचा गर लावू शकता किंवा फेस पॅक बनवूनही लावू शकता. काही दिवसात तुम्हाला एक अद्भुत चमक दिसेल आणि तुमच्या वृद्धत्वाचा प्रभाव तुमच्या चेहऱ्यावर दिसणार नाही.4 / 6काकडीमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात ज्यात एंटी एजिंगयुक्त गुणधर्म असतात. हे गुणधर्म शरीरातील वृद्धत्वाचा प्रभाव कमी करतात. काकडीत व्हिटॅमिन सी देखील असते, जे वृद्धत्वविरोधी सोबतच इतर अनेक फायदे देते. जर तुम्ही रोज काकडी चेहऱ्यावर लावली तर त्यामुळे चेहऱ्यावर चमक तर येतेच पण काळे डाग आणि सुरकुत्या कमी होण्यासही मदत होते.5 / 6चेहर्याची चमक वाढवण्यासाठी मध हे वर्षानुवर्षे वापरले जात आहे. मधामध्ये वृद्धत्वविरोधी गुणधर्म असतात, जे चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यापासून रोखतात. बेसन, लिंबाचा रस किंवा कोरफडीमध्ये मध मिसळून लावू शकता. मध हा एक नैसर्गिक घटक आहे जो सर्वात महागड्या क्रीमपेक्षाही तुमच्या चेहऱ्यावर जास्त प्रभाव दाखवू शकतो.6 / 6कॅल्शियम युक्त दूध तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. तुम्हाला दूध प्यायला त्रास होत असला, तरी दूध तुम्हाला तरुण, सक्रिय आणि ताजेतवानं ठेवते. बेसनाचे पीठ दुधात मिसळून चेहऱ्यावर लावू शकता किंवा कापसाच्या साहाय्याने दूध थेट चेहऱ्यावर लावल्यास अप्रतिम चमक येते. चेहऱ्यावर दूध लावल्याने त्वचेवरील वृद्धत्वाचा प्रभाव कमी होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications