Join us

प्रियांका, दीपिका आणि....या बॉलिवूड अभिनेत्रींनी 'गोरं' होण्यासाठी ट्रिटमेण्ट घेतली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2023 17:37 IST

1 / 8
आजही कितीही नाही म्हटलं तरी गोरं आणि सावळं या दोन वर्णांमध्ये भेद केलाच जातो... अर्थात 'ब्लॅक ब्यूटी' गोऱ्या मुलींपेक्षा कुठे कमी असते, किंवा कमी पडते, असं मुळीच नाही...अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनीही गोरं होण्याची ट्रिटमेण्ट घेतल्याची चर्चा असते. ती अर्थात कन्फर्म होत नाही. मात्र त्यांचे बदललेले रंग ते सांगतात.
2 / 8
पण दोन वर्णांमध्ये केला जाणारा भेदभाव काही अजून संपलेला नाही. आता हेच पाहा ना आज यशाच्या शिखरावर असलेल्या या सावळ्या वर्णाच्या अनेक बॉलीवूड अभिनेत्रींनाही कधीतरी गोरं व्हावं वाटलंच..
3 / 8
यातलं काजोलचं उदाहरण तर आपल्याला माहितीच आहे. काजोलने तिच्या गुणवत्तेवर बॉलीवूडमध्ये स्थान निर्माण केलं होतं, पण तिनेही काही वर्षांनी गोरं होण्यासाठी ट्रिटमेंट घेतली असल्याचे समजते.
4 / 8
प्रियांका चोप्रानेही ट्रिटमेंट घेऊन तिचा रंग बदलला. प्रियांकाच्या आईने एका मुलाखतीदरम्यान सांगितलेही होते की प्रियांकाला लहानपणी नेहमीच तिच्या नातेवाईकांकडून तिच्या वर्णाबाबत टोमणे ऐकावे लागले होते.
5 / 8
गालावर सुंदर खळी असणारी आणि पहिल्याच चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण करणारी अभिनेत्री दीपिका पदुकोन हिनेही तिचा रंग बदलण्यासाठी ट्रिटमेंट घेतली असल्याचे समजते.
6 / 8
ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनीही Skin Lightening Treatment घेतली असल्याचे समजते.
7 / 8
बंगाली ब्यूटी बिपाशा बसूनेही गोरं होण्याची ट्रिटमेण्ट घेतल्याचे कळते.
8 / 8
बॉलीवूडची योगा क्विन तसेच फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिनेही गोरं होण्यासाठी उपचार घेतल्याचे कळते.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीकाजोलरेखाशिल्पा शेट्टीप्रियंका चोप्रा