Join us

सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी फसली, भयानकच दिसतोय चेहरा-१० बॉलिवूड अभिनेत्रींची भलतीच गोष्ट...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2025 16:38 IST

1 / 12
आपण अधिक सुंदर दिसावं किंवा आपलं सौंदर्य खुलून याव यासाठी अनेकजणी प्लॅस्टिक सर्जरी (10 Plastic Surgery Disasters of Bollywood Celebrities) करतात. यामध्ये अनेक सेलिब्रिटी, अभिनेत्री आणि मॉडेल्सचा समावेश होतो. आत्तापर्यंत अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी सुंदर दिसण्यासाठी प्लॅस्टिक सर्जरीची मदत घेतली आहे.
2 / 12
अभिनेत्री आपला लूक ग्लॅमरस करण्यासाठी (Bollywood Actresses Plastic Surgery Went Wrong) लिप सर्जरी, बोटोक्स तसेच नाक आणि ओठांची सर्जरी करतात. परंतु बॉलिवूडमधील अशा (Plastic Surgeries by Bollywood Actresses) अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी सर्जरी केली खरी परंतु त्या सर्जरी केल्यानंतर सुंदर दिसण्याऐवजी फारच वेगळ्या दिसू लागल्या एवढंच नव्हे तर त्या भरपूर ट्रोल देखील झाल्या. अशा बॉलिवूड मधील अभिनेत्री कोणत्या ते पाहा.
3 / 12
अनुष्का शर्माने लिप फिलर आणि जॉलाइन टाइट केली होती. या अभिनेत्रीला तिच्या बदललेल्या लूकमुळे खूप ट्रोल करण्यात आले. लोकांनी तिला बदकाच्या ओठांचा टॅग दिला होता.
4 / 12
सुंदर दिसण्यासाठी आयशा टाकियाने प्लास्टिक सर्जरी केली होती. शस्त्रक्रियेनंतर अभिनेत्रीचा चेहरा विद्रूप झाला होता. त्यामुळे या अभिनेत्रीला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले.
5 / 12
बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आणि कॅनेडियन नृत्यांगना नोरा फतेही. नोराने अधिक सुंदर व आकर्षक दिसण्यासाठी ओठांच्या शस्त्रक्रियेसोबतच ब्रेस्ट इम्प्लांटची सर्जरी देखील केली आहे.
6 / 12
प्रियांकाने काही वर्षांपूर्वी नाकापासून ते ओठांपर्यंत अनेक सर्जरी केल्या आहेत. इंजेक्शन, लिप फिलर आणि इतर अनेक ट्रिटमेंट केल्या असल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
7 / 12
विश्वसुंदरीचा किताब पटकावलेल्या ऐश्वर्यानेही अनेक प्लॅस्टिक सर्जरी केल्या आहेत. असं सांगितलं जातं की, तिने लिप फिलर, फेशियल फिलर, नोज जॉब आणि चीक्स इम्प्लांट केलं आहे.
8 / 12
कतरिना कैफलाही कॉस्मेटिक सर्जरीसाठी खूप ट्रोल करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर फोटोंची तुलना करताना चाहत्यांनी सांगितले की, कॉस्मेटिक सर्जरीनंतर कॅटरिनाचा लूक खराब झाला आहे.
9 / 12
बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूर खानने देखील तिच्या ओठांची आणि चिक बोन्सची सर्जरी केली आहे.
10 / 12
बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंतने देखील प्लास्टिक सर्जरी केली होती. मात्र, प्लास्टिक सर्जरीनंतर तिचा चेहरा आणखी खराब दिसू लागला होता. बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त प्लास्टिक सर्जरी करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये राखी सगळ्यात पुढे आहे.
11 / 12
बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासुने फक्त प्लास्टिक सर्जरी केली नाही तर, स्किन लायट्निंगची ट्रीटमेंट सुद्धा घेतली आहे.
12 / 12
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे जान्हवी कपूर. जान्हवीने आई श्रीदेवी प्रमाणेच ओठांची सर्जरी केली आहे.
टॅग्स : ब्यूटी टिप्सबॉलिवूडसोशल व्हायरल