Join us   

एक स्टोल, एखादाच सुंदर स्कार्फ देतो परफेक्ट स्टायलिश लूक! पाहा सेलिब्रिटी फॅशन.. सोप्या-सुंदर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2022 4:17 PM

1 / 9
१. घरात असलेल्या लोकरीच्या स्कार्फला जुनाट म्हणून टाकून देण्याचा विचार करत असाल, तर कतरिना कैफचा (Katrina Kaif) हा फोटो एकदा बघाच.. तिने खूपच छान पद्धतीने या लोकरीच्या स्कार्फला गळ्याभोवती लपेटलं आहे.. त्यावर तिने घातलेली टोपी तिचा लूक कम्प्लिट करणारी ठरली आहे.
2 / 9
२. कतरिना सारखंच काहीसं आहे हिना खानचं (Hina Khan).. तिचा स्कार्फ देखील लोकरीचाच आहे.. तुमच्याकडे असाच एखादा लोकरीचा स्कार्फ असेल तर फक्त त्यावर मॅचिंग होणारी एक लोकरीची टोपी घेऊन टाका.. टोपी आणि स्कार्फचं कूल कॉम्बिनेशन तुम्हाला एकदम हटके लूक देईल...
3 / 9
३. आलियाचा (Alia Bhat) हा लूक बघा.. बद्री की दुल्हनिया या चित्रपटातला तिचा हा लूक.. जीन्स, कुर्ता आणि त्यावर घेतलेला रंगबेरंगी स्टोल... अगदी कॉलेजपासून ते ऑफिसपर्यंत कुठेही तुम्ही अशा पद्धतीने स्टोल कॅरी करू शकता.
4 / 9
४. सध्या खूपच चर्चेत असणारी दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) हिचाही स्कार्फ किंवा स्टोल लूक बघण्यासारखा आहे. काळ्या आणि पांढऱ्या शर्टवर रश्मिकाने गुलाबी रंगाचा स्टोल घेतला आहे. ड्रेस आणि स्टोल यांचा रंग पुर्णपणे वेगळा असूनही रश्मिकाचा लूक अतिशय क्लासी दिसत आहे.
5 / 9
५. शिल्पा शेट्टीची (Shilpa Shetty) स्टाईल नेहमीच हटके असते.. तिचा ड्रेसिंग सेन्स अतिशय जबरदस्त मानला जातो... म्हणूनच हा बघा शिल्पाचा स्टोल घेतलेला लूक.. ओव्हरकोट असतानाही शिल्पाने स्टोल घेतला आहे.. जीन्स, ओव्हरकोट आणि स्टोल अशी ती एकदमच कॅची दिसते आहे.
6 / 9
६. अभिनेत्री कंगना राणावर (Kangana Ranaut) हिची स्टोल कॅरी करण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. जवळपास ओढणीसारखा वाटावा अशा पद्धतीने तिने स्टोल घेतला असून तिच्या प्रमाणे कुर्त्यावर किंवा एखाद्या टॉपवर किंवा टी शर्ट वरही तुम्ही अशा पद्धतीने स्टोल घेऊ शकता.
7 / 9
७. स्टायलिश बेबोची स्टोल घेण्याची ही फॅशन बघा.. करिनाचा (Kareena Kapoor Khan) स्टोल एखाद्या शॉलप्रमाणे आहे. तिने तो पुर्णपणे गळ्याभोवती लपेटला असून स्टोल अशा पद्धतीने कॅरी करण्याची फॅशन सध्या खूपच ट्रेण्डमध्ये आहे.
8 / 9
८. फॅशन विथ स्टोल या बाबतीत प्रियांका चोप्राही (Priyanka Chopra) मागे नाही.. टी शर्ट, विंटर जॅकेट आणि त्यावर स्टोल अशा पद्धतीचा तिचा हा लूक खूपच आकर्षक झाला आहे. विंटर जॅकेट असतानाही तिचा स्टोल कुठेही अति वाटत नाही...
9 / 9
९. सारा अली खान (Sara Ali Khan) तर नेहमीच तिच्या स्टाईलबाबत चर्चेत असते... तिचा हा स्टोल लूकही खूपच हटके आहे.. सिंपल, सोबर पण तरीही स्टायलिश असं कॉम्बिनेशन पाहिजे असल्यास साराची ही स्टाईल परफेक्ट आहे.
टॅग्स : ब्यूटी टिप्सफॅशनसेलिब्रिटीथंडीत त्वचेची काळजी