हजार रुपयांचं फेशियल करा फक्त १० रुपयांत, बघा कसं करायचं इंस्टंट ग्लो देणारं ब्रायडल फेशियल
Updated:February 16, 2024 15:34 IST2024-02-16T15:27:41+5:302024-02-16T15:34:20+5:30

ज्या फेशियलसाठी पार्लरमध्ये जाऊन कमीत कमी १ हजार रुपये माेजावे लागतात, ते इंस्टंट ग्लो देणारं ब्रायडल फेशियल घरच्याघरी फक्त १० रुपयांचं सामान वापरून कसं करायचं, ते आता पाहूया...
हे फेशियल करण्यासाठी आपण मुख्यत: दह्याचा वापर करणार आहोत. सगळ्यात आधी तर १ चमचा ताजं दही घ्या आणि त्या दह्याने एखादा मिनिट चेहऱ्याला मसाज करा. त्यानंतर चेहरा पुसून घ्या.
यानंतर १ चमचा दही, १ चमचा पिठी साखर आणि अर्धा चमचा कॉफी पावडर घ्या. हे मिश्रण एकत्रित करून त्याने चेहऱ्याला स्क्रबिंग करा. डेड स्किन निघून जाईल.
यानंतर आता १ चमचा दही घ्या. त्यात चिमूटभर हळद आणि ४ ते ५ थेंब लिंबाचा रस घाला. आता या मिश्रणाने चेहऱ्याला १० ते १२ मिनिटे मसाज करा. यामुळे त्वचेवरचं टॅनिंग कमी होण्यास मदत होईल.
प्रत्येक स्टेजमध्ये त्वचेला मसाज करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण त्यामुळे त्वचेखालचा रक्तप्रवाह व्यवस्थित होऊन त्वचेवर ग्लो येण्यास मदत होते.
यानंतर आता शेवटची स्टेप करायची आहे. यामध्ये आपण चेहऱ्यासाठी फेसपॅक तयार करणार आहोत. यासाठी एका वाटीत १ चमचा बेसन पीठ घ्या. त्यात १ चमचा दही, १ चमचा मध टाका. हे मिश्रण व्यवस्थित कालवून घ्या आणि चेहऱ्यावर लावा. १० ते १५ मिनिटांनी जेव्हा फेसपॅक सुकेल, तेव्हा चेहरा धुवून टाका.