केसांच्या सगळ्याच तक्रारी दूर करण्यासाठी चिमूटभर कॉफी 'अशा' पद्धतीने वापरा, केस होतील दाट- लांब By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2024 12:31 PM 1 / 9केसांच्या बाबतीतली कोणतीही तक्रार असेल तर ती दूर करण्यासाठी कॉफी अतिशय उपयुक्त ठरते.2 / 9तुमच्या केसांची नेमकी कोणती तक्रार आहे आणि त्यासाठी कशा पद्धतीने कॉफीचा वापर करायचा, याविषयीचा एक व्हिडिओ iadore_me10 या पेजवर शेअर करण्यात आला आहे.3 / 9केसांची वाढ होण्यासाठी १ टेबलस्पून कॉफी, १ टेबलस्पून लिंबाचा रस एकत्र करून केसांच्या मुळाशी लावा आणि २० ते ३० मिनिटांनी केस धुवून टाका.4 / 9लांब केस पाहिजे असतील तर १ टेबलस्पून कॉफी १ टेबलस्पून खोबरेल तेलासोबत मिसळा आणि हा पॅक केसांच्या मुळाशी २० ते ३० मिनिटांसाठी लावून ठेवा. 5 / 9केसांची चमक गेली असेल तर ती पुन्हा आणण्यासाठी १ टेबलस्पून काॅफी पावडर १ टेबलस्पून मधासोबत मिसळून केसांच्या मुळाशी लावा. हा उपाय आठवड्यातून एकदा करा.6 / 9केस खूप चिकट झाले असतील तर अशा फ्रिझी केसांची समस्या साेडविण्यासाठी १ टेबलस्पून काॅफी २ टेबलस्पून दह्यासोबत मिसळा आणि हे मिश्रण केसांच्या मुळांशी अर्धा तास लावून ठेवा. हा उपाय दोन आठवड्यातून एकदा करा.7 / 9केसांना फाटे फुटू लागले असतील तर १ टेबलस्पून कॉफी १ टेबलस्पून मेयोनिजसोबत मिसळा आणि हे मिश्रण ३० मिनिटांसाठी केसांच्या मुळाशी लावून ठेवा. 8 / 9केस मऊ, दाट होण्यासाठी १ टेबलस्पून कॉफी अर्धा कप मिक्सरमधून बारीक केलेल्या ॲव्हाकॅडोसोबत मिसळून केसांच्या मुळाशी लावा.9 / 9केसांमध्ये खूप कोंडा झाला असेल तर १ टेबलस्पून कॉफी एका वाटीत घ्या. त्यामध्ये टी ट्री ऑईलचे काही थेंब टाका आणि हा लेप केसांच्या मुळांशी २० ते ३० मिनिटांसाठी लावून ठेवा. आणखी वाचा Subscribe to Notifications