Join us   

काळवंडलेला चेहरा होईल उजळ- चमकदार, फक्त ४ स्टेप्समध्ये करा दही फेशियल, मिळेल इंस्टंट ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2024 1:05 PM

1 / 7
सध्या हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा काेरडी पडते आणि खूप लवकर टॅन होते. म्हणून काळवंडलेली त्वचा पुन्हा उजळ आणि चमकदार करायची असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. (Curd facial for reducing tanning and dry skin in winter)
2 / 7
चेहऱ्यावर खूप टॅनिंग झालं असेल तर घरच्याघरी दही फेशियल कसं करायचं, ते पाहूया (How to do facial at home?). हा उपाय ankitasinghkuntal30 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये आपण घरगुती साहित्य वापरून फक्त ४ स्टेप्समध्ये १५ ते २० मिनिटांत फेशियल कसं करायचं ते पाहूया. (home remedies for instant glow)
3 / 7
सगळ्यात आधी तर त्वचा स्वच्छ करण्यासाठी म्हणजेच त्वचेचं क्लिंझिंग करण्यासाठी १ टेबलस्पून दही घ्या. त्यात अर्धा टेबलस्पून मध टाका आणि या मिश्रणाने चेहऱ्याला ४ ते ५ मिनिटे मसाज करा. यानंतर चेहरा पुसून घ्या.
4 / 7
आता स्क्रबिंग करण्यासाठी १ टेबलस्पून दही आणि १ टेबलस्पून तांदाळाचं पीठ घ्या आणि त्याने चेहऱ्यावर हळूवार हाताने मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरची डेड स्किन निघून जाईल.
5 / 7
यानंतर तिसरी स्टेप करण्यासाठी १ टेबलस्पून दही घ्या. त्यात चिमूटभर हळद आणि लिंबाच्या रसाचे ५ ते ६ थेंब घाला. याने चेहऱ्याला ४ ते ५ मिनिटे मसाज करा.
6 / 7
यानंतर आता आपण शेवटची स्टेप करणार आहोत. यासाठी दही वापरून आपल्याला त्वचेसाठी फेसमास्क करायचा आहे. त्यासाठी एका वाटीत १ टेबलस्पून दही घ्या. त्यात १ टीस्पून कॉफी पावडर आणि १ टेबलस्पून मुलतानी माती टाका. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घ्या आणि हा फेसपॅक चेहऱ्याला लावा. १० ते १२ मिनिटांनी फेसपॅक सुकला की चेहरा धुवून टाका.
7 / 7
चेहऱ्यावरचं टॅनिंग कमी करून इंस्टंट ग्लो मिळविण्यासाठी हा उपाय अतिशय चांगला आहे.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी