कशाला महागडं ब्लीच, डी- टॅन फेशियल करता? फक्त ५ रुपयांत चमकेल त्वचा- बघा हा उपाय By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2024 5:28 PM 1 / 7सध्या उन्हाचा कडाका खूप वाढला आहे... त्यामुळे त्वचेचं खूप नुकसान होतं. त्वचा खूप लवकर टॅन होते. अंग कितीही झाकून आपण घराबाहेर पडलो तरीही टॅनिंग होतंच..2 / 7त्वचेवरचं टॅनिंग काढून टाकण्यासाठी अनेक जण ब्लीच, डी- टॅन फेशियल करतात. किंवा काही जणी तर बॉडी पॉलिशिंगही करून घेतात. पण यासाठी खूप जास्त पैसे मोजावे लागतात.3 / 7तुम्हाला जर पार्लरमध्ये जाऊन एवढे पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल किंवा मग तेवढा वेळ नसेल तर हे काही सोपे घरगुती उपाय करून पाहा. हे उपाय केल्यामुळे टॅनिंग कमी होण्यास निश्चितच मदत होईल.4 / 7टॅनिंग कमी करण्यासाठी हळद खूप उपयुक्त ठरते. त्यामुळे हळद आणि कच्चं दूध असं मिश्रण एकत्र करा आणि त्याचा लेप चेहऱ्यावर तसेच इतर अंगावर लावा. 5 / 7यानंतर हळद, कच्चं दूध आणि बेसन पीठ असं मिश्रण एकत्र करा आणि ते चेहऱ्यावर, अंगावर चोळून लावा. चेहऱ्यावर खूप जास्त जोरात चोळू नका. लेप सुकत आला की पुन्हा एकदा मसाज करा आणि तो चोळून काढून टाका.6 / 7या मिश्रणात तुम्ही थोडं दही किंवा थोडा लिंबाचा रसही टाकू शकता. हे दोन्हीही टॅनिंग कमी करणारे नॅचरल एजंट म्हणून ओळखले जातात.7 / 7यानंतर त्वचा धुवून टाका आणि त्वचेला छान मॉईश्चराईज करा. त्वचेवर डी- टॅन, ब्लीच केल्यासारखाच छान ग्लो येईल. आणखी वाचा Subscribe to Notifications