1 / 5चमकदार, पिंपल्स- ॲक्ने- पिगमेंटेशन नसणारी निरोगी त्वचा दीपिका पादुकोणच्या सौंदर्यात चार चाँद लावते. पण अशी त्वचा मिळविण्यासाठी आणि ती नेहमी तशीच ठेवण्यासाठी दीपिका न चुकता काही गोष्टी नियमितपणे करते. (Deepika Padukone shared her skin care routine)2 / 5त्या गोष्टी नेमक्या कोणत्या याविषयीची माहिती तिने स्वत:च इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. जुलै महिना ‘Self-Care Month’ म्हणून ओळखला जातो. दीपिका म्हणते अशा पद्धतीच्या महिन्याची गरजच काय आहे, कारण तुम्ही स्वत:ची काळजी दर दररोजच अगदी प्रत्येक क्षणी घेतली पाहिजे. ती म्हणते मी माझी स्वत:ची तसेच माझ्या त्वचेची काळजी रोज घेते.. त्यासाठी बघा ती नेमकं काय करते..(Deepika Padukones beauty secret)3 / 5सुंदर त्वचा मिळवायची असेल तर दीपिकाने ४ गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या आहेत. त्या म्हणजे योग्य आहार, पुरेशी झोप, शरीर हायड्रेटेड ठेवणे आणि व्यायाम करणे.4 / 5याशिवाय तिचं एक खास स्किन केअर रुटीनही आहे. क्लिझिंग, हायड्रेट आणि प्रोटेक्ट या ३ टप्प्यांमध्ये ती ते पार पाडते.5 / 5याशिवाय आठवड्यातून एकदा ती फुल बॉडी मसाज करते. शिवाय फेसमास्क आणि हेअरमास्कदेखील लावते. त्यासाठी ती नेमके कोणकोणते प्रोडक्ट वापरते, याची माहितीही तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटला शेअर केली आहे. बघा आता तिच्यासारखी त्वचा पाहिजे असेल तर यातलं काय काय तुम्ही करू शकता...