Deepika Padukone's beauty secret for glowing skin, home remedies for the radiant glow
पाहा दीपिका पादुकोणचं ब्यूटी सिक्रेट! फक्त ४ स्टेप्स- दिवाळीपर्यंत त्वचेवर येईल सोनेरी तेजPublished:October 22, 2024 01:01 PM2024-10-22T13:01:53+5:302024-10-22T13:11:17+5:30Join usJoin usNext दिवाळीपर्यंत तुमचीही त्वचा दीपिका पादुकाेणच्या त्वचेसारखी चमकदार व्हावी असं वाटत असेल तर या काही टिप्स लगेच पाहून घ्या..(Deepika Padukone's beauty secret for glowing skin) दिवाळीच्या काळात प्रत्येकीच्याच मागची कामं एवढी वाढलेली असतात की त्या कामांमधून वेळ काढून स्वत:च्या त्वचेकडे लक्ष देणं अजिबातच होत नाही. म्हणूनच दीपिका पादुकोणचं हे स्किन केअर रुटीन काही दिवस तुम्हीही ट्राय करून पाहा..(home remedies for the radiant glow) दिवाळीपर्यंत नक्कीच चेहऱ्यावर छान ग्लो येईल आणि त्वचा फ्रेश, नितळ दिसेल.. त्वचेची काळजी घेण्यासाठी दीपिका कोणतं स्किन केअर रुटीन फॉलो करते, याविषयी माहिती सांगणारा व्हिडिओ rohitsachdeva1 या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सुरुवातीला तर चेहरा एखादं क्लिंझिंग लोशन लावून किंवा घरगुती फेसपॅक लावून व्यवस्थित स्वच्छ करून घ्या. त्यानंतर चेहऱ्यावर आईस ट्रिटमेंट करा. यासाठी चेहरा बर्फाच्या थंड पाण्यात काही काळ बुडवून ठेवा किंवा बर्फ एखाद्या कपड्यामध्ये गुंडाळून त्याने त्वचेवर मालिश करा. यानंतर त्वचेला छान मॉईश्चराईज करा. यासाठी एखादं चांगलं दर्जेदार माॅईश्चरायझर वापरा. सगळ्यात शेवटी त्वचेवर सनस्क्रिन सिरम लावा. तुम्ही बाहेर कुठेही न जाता घरातच राहणार असाल तरीही न चुकता सनस्क्रिन सिरम किंवा लोशन लावायला हवे. असं तुमचं स्किन केअर रुटीन असेल तर बघा काही दिवसांतच तुमच्या चेहऱ्यावर तेज येईल...टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडीBeauty TipsSkin Care TipsHome remedy