Join us   

ब्लॅकहेड्समुळे नाक खूपच खरखरीत दिसते? ४ सोपे उपाय, नाकावरची त्वचा होईल स्वच्छ- मऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2023 2:11 PM

1 / 7
नाकावर उगवलेले ब्लॅकहेड्स सौंदर्यासाठी फारच मारक ठरतात. बाकीचा चेहरा फ्रेश- स्वच्छ आणि नाकावर मात्र भरपूर ब्लॅकहेड्स.... असा विचित्र प्रकार झाला की चारचौघांसमोर खूपच लाजिरवाणं होतं.
2 / 7
त्वचेमध्ये तयार होणारं तेल त्वचेवर असणाऱ्या छिद्रांमधून बाहेर येतं. ते जेव्हा त्याच्या नैसर्गिक रुपात असतं तेव्हा त्याला आपण व्हाईट हेड्स म्हणतो. त्याची हवेतील कणांशी प्रक्रिया झाल्यावर ते ऑक्सिडाईज होऊन काळे होतात. त्याला आपण ब्लॅक हेड्स म्हणताे.
3 / 7
ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी आता कोणते घरगुती उपाय आपल्याला करता येतील, ते पाहूया.. या उपायांपैकी जो तुम्हाला सोपा वाटेल तो करून बघा.
4 / 7
बेकिंग सोडा आणि पाणी सम प्रमाणात घ्या आणि त्याची एक घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट नाकावर लावा आणि हलक्या हाताने २ मिनिटे गोलाकार दिशेने मसाज करा. त्यानंतर नाक धुवून टाका. यानंतर नाकावर मॉईश्चरायझर लावायला विसरू नका कारण त्वचा कोरडी होऊ शकते. हा उपाय आठवड्यातून २ वेळा करावा.
5 / 7
ग्रीन टी ची वापरून झालेली बॅग ब्लॅकहेड्ससाठी उत्तम उपाय आहे. त्यासाठी बॅग पुर्णपणे उघडून घ्या. त्याच्यातलं साहित्य एक वाटीत काढा. त्यामध्ये मध टाका आणि हा लेप ब्लॅकहेड्सवर चोळून लावा. दोन- तीन मिनिटांनी चेहरा धुवून टाका.
6 / 7
साखर, लिंबाचा रस आणि मध हे मिश्रण एकत्र करून त्याने नाकावर मसाज करा. ब्लॅकहेड्स, व्हाईट हेड्स काढून टाकण्यासाठी हा एक चांगला उपाय आहे.
7 / 7
दही, बेसन पीठ आणि हळद यांचा लेप नाकावर चोळून लावल्यानेही ब्लॅकहेड्स निघून जाण्यास मदत होते.
टॅग्स : ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीहोम रेमेडी