Join us

सुंदर दिसण्यासाठी रोज काजळ लावताय? 'या'५ चुका टाळा, डोळ्यांचे तेजही हरवेल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2025 17:14 IST

1 / 8
डोळ्यांना काजळ लावल्याने डोळे अतिशय सुंदर आणि आपल्या सौंदर्यात भर पाडतात. आपल्यापैकी अनेकांना रोज काजळ लावण्याची सवय असते. (Mascara and kajal mistakes to avoid)
2 / 8
डोळे सुंदर दिसण्यासाठी आणि चेहरा अधिक उठून दिसण्यासाठी आपण अनेकदा काजळ लावतो. परंतु, काजळ लावताना काही चुका केल्यास आपला सुंदर लूक खराब होऊ शकतो. (How to keep eyes healthy with makeup)
3 / 8
अनेकदा डोळ्यांसाठी आपण महागातले किंवा घरात तयार केलेले काजळ वापरतो.पण काही चुका टाळल्यास आपल्याला परफेक्ट लूक मिळू शकतो. (Avoid eye makeup damage)
4 / 8
आपण डोळ्यांना काजळ लावताना जुने किंवा अशुद्ध काजळ लावू नये. यामुळे डोळ्यात इन्फेक्शन, जळजळ किंवा ऍलर्जी होऊ शकते. काजळ वापरण्यापूर्वी ब्रॅण्ड आणि एक्सपायरी डेट तपासा.
5 / 8
आपल्यापैकी अनेकांना डोळ्यांच्या बाहेरील रेषेवर काजळ लावण्याची सवय असते. ज्यामुळे ते सहज पसरते. काजळ लावताना ते डोळ्यांच्या पापणीवरचं हलक्या थराने लावा.
6 / 8
काजळ लावताना डोळ्याला किंवा पापणीवर घासून लावू नका. यामुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकते. काजळ लावताना ते एकदम हलक्या हाताने लावायला हवे.
7 / 8
काजळ लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. खराब हात असतील तर डोळ्यात घाण जाऊ शकते. ज्यामुळे डोळ्यांना इनफेक्शन होईल.
8 / 8
काजळ किंवा आयलायनर लावण्यापूर्वी डोळ्यांवर जास्त दाब देऊ नका. जास्त प्रमाणात काजळ लावत असाल तर डोळ्यांना त्रास होईल.
टॅग्स : ब्यूटी टिप्स