1 / 7उन्हाळा असल्यामुळे घाम येणं साहजिक आहे. पण आपल्या आजुबाजुला आपण असे बरेच लोक पाहातो ज्यांना इतरांपेक्षा थोडा जास्तच घाम येतो. बऱ्याचदा त्यांचं डोकं, अंग आणि चेहराही घामाने डबडबलेला असतो..2 / 7असा अतिप्रमाणात घाम येणं निश्चितच आरोग्यासाठी चांगलं नाही. त्यासाठी तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन योग्य सल्ला नक्कीच घ्यावा. पण त्याआधी हे काही घरगुती उपाय करून घाम नियंत्रित ठेवण्याचा प्रयत्नही नक्कीच करून पाहा.3 / 7मान, गळा, काख अशा ज्याठिकाणी तुम्हाला जास्त घाम येतो, त्याठिकाणी दिवसांतून दोन वेळा थोडा बर्फ चोळून पाहा.4 / 7घाम जास्त येणाऱ्या भागाला काकडीचा रस करून लावा आणि त्यानंतर साधारण १० ते १५ मिनिटांनी आंघोळ करा. घाम येण्याचं प्रमाण कमी होईल.5 / 7रोज एक कच्चा टोमॅटो खा. सलाड, ज्यूस, कोशिंबीर अशा कोणत्याही माध्यमातून तो खाल्ला तरी चालेल. यामुळेही घाम येण्याचे प्रमाण बरेच कमी होते. 6 / 7काही जणांच्या तळपायाला खूप घाम येतो. अशा लोकांनी तुरटीच्या पाण्यात काही वेळ पाय बुडवून बसावे. 7 / 7तुमच्या आहारातले मिठाचे प्रमाण कमी केल्यानेही घाम येण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.