कितीतरी शॅम्पू बदलले-केसांची अवस्था वाईटच? डॉक्टर सांगतात, सकाळी १ काम करा, लांबसडक होतील केस Published:September 17, 2024 05:38 PM 2024-09-17T17:38:01+5:30 2024-09-18T17:44:40+5:30
Does Copper Water Help In Hair Growth Know From Experts : पोषण विशेषज्ञांच्यामते तुमच्या दिवसाची सुरूवात तुम्ही तांब्याच्या भांड्यातलं पिऊन करायला हवी. आपले केस लांबसडक दाट (Long Hairs असावेत असं अनेकांचं स्वप्न असते. हेअर ग्रोथ (Hair Growth) होण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. खासकरून महिला महागड्या उत्पादनांचा वापर करतात. काही खास घरगुती उपाय तुमच्या केसांची चांगली वाढ होण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
प्रसिद्ध न्युट्रिशनिस्ट सोनिया नारंग यांनी अलिकडेच एका पॉडकास्टमध्ये एक नवीन उपाय सांगितला आहे. ज्यामुळे नैसर्गिकरित्या केस वाढवण्यास मदत होते.
कोणत्याही तांब्याच्या भांड्यात किंवा तांब्याच्या बॉटलमध्ये पाणी भरून सकाळी त्या पाण्याचे सेवन करा. ज्यामुळे केसांशी संबंधित समस्या उद्भवणार नाहीत आणि हेअर फॉल कमी होईल.
न्युट्रिशननिस्ट सोनिया नारंग सांगतात की तांब्याच्या भांड्यात पाणी एक केटेलिस्ट म्हणजेच उत्प्रेरकाचे काम करते. आरबीसी म्हणजेच रेड ब्लड सेल्स आयर्न कम्पाऊड्स काढून देतात.
ज्यामुळे हेअर फॉलची समस्या उद्भवत नाही आणि वेळेआधीच केस पांढरे होणं रोखता येतं. केस हेल्दी राहतात आणि वाढ होते
तांब्याच्या भांड्यात पाणी पिण्याव्यतिरिक्त न्युट्रिशनिस्ट कढीपत्ता खाण्याचा सल्ला देतात.
सोनिया नारंग सांगतात की कडीपत्त्यात व्हिटामीन, ए, सी आणि आयर्न भरपूर असते ज्यामुळे केस हेल्दी आणि निरोगी राहतात.