केस सतत विस्कटलेले दिसतात? हे ५ उपाय करून बघा ..केस दिसतील मस्त सरळ
Updated:February 23, 2025 19:15 IST2025-02-23T19:08:02+5:302025-02-23T19:15:08+5:30
Does your hair look frizzy all the time? Try these 5 remedies : केस छान राहावेत यासाठी हे ५ उपाय करून बघा.

कितीही छान कपडे घालून तयार झालं तरी, केस विंचरलेले हवेत. कारण विस्कटलेल्या केसांमुळे माणूस झोपेतून उठून आल्यासारखा दिसतो.
बरेचदा केस कितीही छान विंचरले तरी थोड्याच वेळात विस्कटून जातात. खरखरीत होतात.
केस तुटक- तुटक दिसायला लागतात. आणि लहान केस उभे राहतात.
पोटॅशियमच्या कमतरतेमुळे असे होते. पातळ केसांना वारा लागला की ते लगेच विस्कटतात.
जर तुमचेही केस असेच विस्कटलेले दिसत असतील तर, या काही घरगुती हेअरपॅक्सचा वापर करून बघा. नक्की फरक जाणवेल.
१. केसांना सरळ करण्यासाठी केळ्याचा वापर करा. केळ्याची पेस्ट करून घ्या. ती केसांना लावा. तासभर ठेवा. मग धुवून टाका. केळ्यामध्ये भरपूर पोटॅशियम असते.
२. कोरफड केसांसाठी सर्वच प्रकारे चांगली असते. केसांच्या वाढीसाठी, केसांच्या आरोग्यासाठी त्याचप्रमाणे केस सरळ राहण्यासाठीही मदत होते.
३. मेथीच्या पाण्याने केस धुतल्यानेही वाकडे तिकडे झालेले केस छान होतात. केसांसाठी उपयुक्त अशी पोषकसत्वही मिळतात.
४. दही व मध यांच्या मिश्रणातून मस्त हेअर मास्क तयार करता येतो. त्यामुळेही केस विस्कटलेले दिसत नाहीत.
५. केस तांदळाच्या पाण्याने धुवायचे. त्याचे अनेक फायदे आहेत. केस छान राहतात. तसेच केसांची ठेवणही छान दिसते.